आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकाेण, तिची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाश, सारा अली खान, श्रद्धा कपूरसह इतरांना क्लीन चिट दिल्याच्या माध्यमांतील वृत्तांचा नार्काेटिक्स कंट्राेल ब्युराेने (एनसीबी) इन्कार केला आहे. एनसीबीने बुधवारी सांगितले की, आम्ही फक्त ड्रग्जच्या अँगलने तपास करत आहोत, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा नाही. एनसीबी अधिकाऱ्यांनी एडीजी अनिल सिंह यांच्या वक्तव्याचीही पाठराखण केली. सिंह मुंबई हायकाेर्टात एनसीबीची बाजू मांडत आहेत. अधिकाऱ्यांनी म्हटले की, अनिल सिंह यांच्या कोर्टातील निवेदनास वेगळ्या संदर्भात सादर केले जात आहे.
एनसीबी अधिकाऱ्याशी चर्चा
> प्रश्न : रिया आणि तस्करांच्या प्रकरणात आजवर किती अमली पदार्थ जप्त केलेत?
अधिकारी : जवळपास दीड किलो चरस पकडले आहे. गांजाही मोठ्या प्रमाणात आढळला आहे. रिया व शौविकला १० ते २० वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. हे संघटित गुन्हेगारीचे प्रकरण आहे.
> प्रश्न : रियाच्या वकिलांचे म्हणणे आहे की, ज्याला ड्रग्जचा पुरवठा व्हायचा ती व्यक्तीच जिवंत नाही. मग खरोखरच ड्रग्ज कार्टेल अस्तित्वात आहे, हे कसे सिद्ध होईल?
अधिकारी : ड्रग कार्टेलमध्ये फक्त एकटा सुशांतच नाही. या प्रकरणात आम्ही १९ जणांना अटक केली आहे. इतर आरोपींकडूनही ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.