आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Rajendra Nath Was Chased Out Of The House By His Brother Prem Nath Due To Carelessness, People Were Harassed For Money After He Became Poor

बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:बेफिकीरपणामुळे प्रेम नाथांनी राजेंद्र नाथांना घराबाहेर हाकलले होते, कंगाल झाल्यानंतर लोकांनी पैशांसाठी छळले होते

लेखक: इफत कुरेशी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजेंद्र नाथ यांचा प्रवास

60 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेता राजेंद्र नाथ यांची आज 93 वी जयंती आहे. राजेंद्र नाथ अशा काळात चित्रपटसृष्टीत आले जेव्हा मेहमूद यांनी आपल्या कर्तृत्वाने जॉनी वॉकरसारख्या बड्या कॉमेडियनला मागे टाकले होते. असे असूनही राजेंद्र नाथ यांनी स्वत:ची इंडस्ट्रीत एक वेगळी जागा निर्माण केली. राजेंद्र हिरो बनण्यासाठी मुंबईत आले होते, पण त्यांना खरी ओळख कॉमेडीतून मिळाली.

भाऊ प्रेम नाथ यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजेंद्र मुंबईत आले, पण कामातील बेफिकीरपणा त्यांच्या मोठ्या भावाला सहन झाला नाही. प्रकरण इतके वाढले की प्रेम नाथ यांनी त्यांना घराबाहेर हाकलून दिले. अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर राजेंद्र नाथ चित्रपटात आले पण त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फ्लॉप ठरले. त्यांना खरी ओळख मिळाली 1959 च्या 'दिल देके देखो' या चित्रपटातून. पण ही ओळख नायक म्हणून नव्हे तर कॉमेडियनच्या रुपात मिळाली. तेव्हापासून 1998 पर्यंत राजेंद्र नाथ जवळपास 253 चित्रपटांमध्ये झळकले. कॉमेडीशिवाय त्यांनी चित्रपट निर्मितीतही हात आजमावला, पण पहिल्याच चित्रपटामुळे ते मोठ्या कर्जात बुडाले.

राजेंद्र नाथ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया, ते मुंबईत नायक बनण्यासाठी कसे पोहोचले आणि उत्कृष्ट कॉमेडियन कसे बनले -

राजेंद्र नाथ यांचा जन्म 8 जून 1931 रोजी टिकमगड येथे झाला. त्यांचे वडील एक पोलिस अधिकारी होते जे पाकिस्तानातील पेशावर येथून भारतात आले होते. त्यांच्या वेगवेगळ्या शहरात पोस्टिंग असायची. अभिनेते प्रेम नाथ हे त्यांचे मोठे भाऊ होते, जे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नायक बनण्यासाठी मुंबईला गेले.

रीवा येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, प्रेमनाथ यांच्या सांगण्यावरून राजेंद्र नाथ यांनीही 1947 मध्ये मुंबई गाठली. त्यावेळी राजेंद्र नाथ यांची बहीण कृष्णा यांचा विवाह पृथ्वीराज कपूर यांचे चिरंजीव राज कपूर यांच्याशी झाला, त्यामुळे त्यांना मुंबईत मदत मिळाली. राजेंद्र नाथ पृथ्वी थिएटरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी दीवार, आहुती, पठाण आणि शकुंतला यांसारख्या नाटकांमध्ये भाग घेतला.

सुरुवातीचे दिवस होते संघर्षाचे

नाटकाव्यतिरिक्त राजेंद्र नाथ यांना चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळू लागल्या. या भूमिका इतक्या छोट्या होत्या की, त्यांच्याकडे कुणी लक्षही दिले नाही. प्रेम नाथ यांची इंडस्ट्रीत चांगली पकड होती आणि कमाईही चांगली होती, त्यामुळे राजेंद्र नोकरी करत नसूनदेखील आलिशान आयुष्य जगत होते. लवकरच प्रेम नाथ यांना त्यांच्या धाकट्या भावाची ही बेफिकीर वृत्ती खटकायला लागली होती.

मोठ्या भावाने घराबाहेर काढले

एके दिवशी, राजेंद्र नाथांच्या निष्काळजीपणामुळे व्यथित होऊन प्रेम नाथ यांनी त्यांना घराबाहेर हाकलून दिले. राजेंद्र मोठ्या भावाच्या दुसऱ्या घरी राहायला गेला. छत होते, पण जेवणासाठी पैसे नव्हते आणि घरात वस्तूही नव्हत्या. स्कूटर होती पण त्यात पेट्रोल टाकायला पैसे नव्हते. त्यावेळी राजेंद्र नाथ यश जोहर (करण जोहरचे वडील) यांच्यासोबत राहत होते, जे त्यावेळी त्यांच्यासोबत करिअरमध्ये संघर्ष करत होते. आता राजेंद्र यांना उदरनिर्वाहासाठी काम शोधणे भाग होते.

पोपटलाल म्हणून निर्माण केली ओळख
जेव्हा प्रेम नाथ यांनी जेव्हा त्यांचे प्रोडक्शन हाऊस पीएन प्रोडक्शन उघडले तेव्हा त्यांनी 1953 च्या 'शगुफा' आणि 1954 मधील 'गोलकुंडा का कैदी' या चित्रपटात भाऊ राजेंद्र नाथ यांना साइड रोल दिले. पण दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. 1956 मध्ये राजेंद्र पहिल्यांदा 'हम सब चोर हैं' या चित्रपटात कॉमेडी करताना दिसले आणि यावेळी त्यांना भरपूर प्रशंसा मिळाली. 1959 मध्ये राजेंद्र शरारत आणि दिल देके देखो मध्ये पुन्हा एकदा कॉमिक भूमिकेत दिसले. 'दिल देके देखो' हा त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा हिट चित्रपट होता. राजेंद्र यांनी 1961 मध्ये आलेल्या जब प्यार किसी से होता है या चित्रपटात पोपटलालची भूमिका साकारली होती, या चित्रपटामुळे त्यांना देशभरात त्याच नावाने ओळख मिळवून दिली. या चित्रपटात राजेंद्र नाथ मुख्य अभिनेते देव आनंद यांच्या वरचढ ठरले होते.

चित्रपट बनवताना कंगाल झाले होते राजेंद्र नाथ

1974 मध्ये राजेंद्र यांनी आपल्या सर्व ठेवी गुंतवून 'द गेट क्रेशर' हा चित्रपट बनवला. या चित्रपटात नीतू सिंग आणि रणधीर कपूर मुख्य भूमिकेत होते. राजेंद्र यांचे कॉमेडीवर प्रभुत्व होते, पण त्यांना चित्रपट सृष्टीचा अनुभव नव्हता. कलाकार, क्रू आणि दिग्दर्शकाने जी फी मागितली ती राजेंद्र यांनी त्यांना दिली. याचा परिणाम असा झाला की, ओव्हर बजेटमुळे चित्रपटाचे शूटिंग 10 दिवसांतच थांबले. राजेंद्र यांना आता घेतलेले पैसे आणि कर्ज सर्व गुंतवले होते, पण चित्रपट बनण्याआधीच थांबला. सावकारांना त्यांचे पैसे परत करावे लागले होते.

हसणाऱ्या राजेंद्र नाथांना लोकांनी पैशांसाठी छळले

कर्ज फेडण्यासाठी राजेंद्र नाथ प्रत्येक चित्रपट साइन करू लागले. छोटे-मोठे रोल करून कर्ज फेडणे अशक्य होते. लोक त्यांना त्रास देऊ लागले आणि अधिकाधिक व्याजाची मागणी करू लागले. एका मुलाखतीदरम्यान राजेंद्र म्हणाले होते, "यूपी आणि दिल्लीच्या वितरकांनी मला अक्षरशः छळले. माझी स्थिती माहीत असूनही, लोकांनी माझ्याकडून जास्त व्याज आकारले आणि प्रत्येक पैसा परत घेतला."

भावाच्या मृत्यूनंतर कोलमडले होते राजेंद्र नाथ
1991 मध्ये प्रेम नाथ यांच्या निधनानंतर राजेंद्र नाथ कोलमडले होते. सगळ्यांना हसवणाऱ्या राजेंद्र नाथ यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. 7 वर्षांनंतर 1998 मध्ये लहान भाऊ नरेंद्र नाथ यांचेही निधन झाले, ज्यामुळे त्यांना आणखीनच मोठा धक्का बसला. त्याच वर्षी राजेंद्र नाथ अभिनयापासून दुरावले. ते लोकांपासून अलिप्त राहू लागले. राजेंद्र नाथ यांचे 2008 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

राजेंद्र नाथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 253 चित्रपटांमध्ये काम केले. राजेंद्र नाथ हे शेवटचे 'हम पांच' या टेलिव्हिजन शोमध्ये पोपटलालच्या भूमिकेत दिसले होते. पोपटलालच्या भूमिकेतून राजेंद्र नाथ यांना ओळख मिळाली आणि त्यांची शेवटची भूमिकादेखील हीच ठरली.

बातम्या आणखी आहेत...