आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कॉपीराईट हक्काचा भंग:तेलंगणा उच्च न्यायालयाने दिली अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती, देश-विदेश आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकणार नाही चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अखिलेश पॉलने आपली फसवणूक केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

तेलंगणा उच्च न्यायालयाने अमिताभ बच्चन यांच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटाच्या ऑल इंडिया रिलीजवर स्थगिती आणली आहे. आता हा चित्रपट देश-विदेश किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकणार नाहीये. याचिकाकर्ते हैदराबाद येथील चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार हे आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, फुटबॉलपटू अखिलेश पॉल यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे एक्सक्लूझिव्ह राइट्स हे त्यांच्याकडे आहेत. असे असूनही, झुंड या चित्रपटाची निर्मिती केली गेली. अखिलेश पॉलने आपली फसवणूक केल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे.

  • का झाला कॉपीराईट हक्काचा भंग?

काही वर्षांपूर्वीच फुटबॉलर अखिलेश पॉल यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याचे हक्क नंदी कुमार यांनी विकत घेतले होते. अखिलेश पॉल हा 2010 साली झालेल्या फुलबॉल वर्ल्ड कपसाठी भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन होता. त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करण्याचा अधिकार नंदी कुमार यांनी विकत घेतला होता. मात्र आता झुंडमधून विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात ही कथा दाखवण्यात आल्यामुळे कॉपीराईट हक्काचा भंग झाला आहे. 'झुंड' चित्रपटात प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची कथा मांडण्यात आली होती. झोपडपट्टीत राहण्या-या गरीब मुलांचे खेळातून करियर घडावे यासाठी विजय बारसे यांनी आयुष्यभर प्रयत्न केले होते. समाजाकडून वाईट वागणूक मिळाल्याने वाममार्गाला गेलेल्या काही मुलांना विजय बारसे यांनी फुटबॉलपटू बनवले होते. त्यातील काही मुलांनी परदेशातील होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये देखील चमकदार कामगिरी केली होती. अखिलेश पॉल हा त्यापैकीच एक फुटबॉल खेळाडू आहे.

  • मे 2020 मध्ये रिलीज होणार होता चित्रपट

या चित्रपटात सैराट फेम जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर देखील दिसणार आहेत. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्णा कुमार, राज हीरेमथ, सविता राज आणि नागराज मंजुळे यांनी संयुक्तपणे केली आहे. लॉकडाउनपूर्वी हा चित्रपट 8 मे रोजी रिलीज होणार होता. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे.