आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाकारांचा सन्मान:रवीना टंडन आणि संगीतकार एमएम किरवानी यांना पद्मश्री, गायिका वाणी जयराम यांना मरणोत्तर पद्मभूषण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा दरवर्षी पद्म पुरस्काराने गौरव करण्याच येतो. जानेवारी महिन्यात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यात सहा मान्यवरांना पद्मविभूषण, नऊ मान्यवरांना पद्मभूषण, तर 91 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. बुधवारी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी कलाक्षेत्रातील कलाकारांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘आरआरआर’ या चित्रपटाचे संगीतकार एमएम किरवानी आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्याबरोबरच तबलावादक झाकीर हुसैन आणि तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका वाणी जयराम यांना अनुक्रमे पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेला. हुसैन यांना यापूर्वी 1998 मध्ये पद्मश्री आणि 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गायिका वाणी जयराम यांना मरणोत्तर पद्मभूषण देण्यात आला.

पद्म पुरस्कार सोहळ्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या पुरस्कार सोहळ्यासाठी रवीनाने खास लूक केला होता. तिने यावेळी साडी, केसात गजरा आणि कानात झुमके असा लूक केला होता. या व्हिडिओत ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उपस्थितीत मान्यवरांना नमस्कार करताना दिसत आहे. यानंतर रवीनाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नमस्कार केला. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रवीनाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

ऑस्कर विजेते ‘आरआरआर’ चित्रपटाचे संगीतकार एमएम किरावानी यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वाणी जयराम यांना पद्मभूषण
दिवंगत गायिका वाणी जयराम यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वाणी यांनी एकूण 18 भाषांमध्ये गाणी गायली. बॉलिवूडलाही देखील त्यांनी अनेक उत्तम गाणी दिली. 1980 मध्ये 'मीरा' चित्रपटातील 'मेरे तो गिरधर गोपाल' या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 4 फेब्रुवारी 2023 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी चेन्नईतील राहत्या घरी त्यांचे निधन झाले होते. करिअरमध्ये गायली 10 हजारांहून अधिक गाणी वाचा सविस्तर...