आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पद्मिनी कोल्हापुरेंच्या घरी लगीनघाई:शजा मोरानीसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे पद्मिनी कोल्हापुरेंचा मुलगा प्रियांक शर्मा, कोर्टात करणार लग्न

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेब्रुवारी 2021 मध्ये ते मोठ रिसेप्शन ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा आणि 'सब कुशल मंगल है' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता प्रियांक शर्मा लवकरच लग्न करणार आहे. चित्रपट निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानीसोबत प्रियांक लग्न करणार आहे. दोघांनी कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी दोघे 9 डिसेंबर रोजी कोर्टात अर्ज करतील. याशिवाय हे दोघे पारंपरिक पद्धतीनेही विवाहबद्ध होतील. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये ते मोठ रिसेप्शन ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे.

कोरोना काळात कोर्ट मॅरेज करणारी दुसरी जोडी
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, प्रियांक आणि शजा या दोघांच्या कुटूंबीयांनी लग्नाची तयारी सुरु केली आहे. प्रियांक शजा सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत होता. गेली अनेक वर्षे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते. आता ते दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. अलीकडेच अभिनेता शाहीर शेखनेही रुचिका कपूरसोबत कोर्टात नोंदणी पद्धतीने लग्न केले होते.

रीवाबरोबर प्रियांकने डेब्यू केला होता
प्रियांकने चित्रपटात येण्यापूर्वी नादिरा बब्बर यांचा ग्रुप, नीरज काबी आणि सलीम आरिफ यांच्याबरोबर थिएटर केले आहे. त्याने रवि किशन यांची मुलगी रीवा सोबत सब कुशल मंगल है या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. शजा काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे चर्चेत आली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser