आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा 4 फेब्रुवारी रोजी निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शाजासोबत विवाहबद्ध झाला. या लग्नाला भाग्यश्री आणि जुही चावला यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पद्मिनी यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम करुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1965 रोजी एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला.
वयाच्या 10 व्या वर्षी केली होती करिअरची सुरुवात
पद्मिनी यांनी वयाच्या दहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून 'इश्क इश्क इश्क' या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी 'सत्यम शिवम सुंदरम्', 'साजन बिना ससुराल', 'थोडी
सी बेवफाई' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी 'जमाने को दिखना है' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते.
1980 मध्ये आलेल्या 'इन्साफ का तराजू' चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. ऋषी कपूर यांच्यासोबत त्या 'प्रेम रोग'मध्ये झळकल्या होत्या. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा पुरस्कार मिळाला. 1982 आणि 83 मध्ये त्यांनी 'विधाता' आणि 'सौतन'सारख्या दोन हिट चित्रपटात काम केले. या काळात मिथुन चक्रवर्तीसोबत आलेला 'प्यार झुकता नही' चित्रपट यशस्वी ठरला आणि या चित्रपटाने ही जोडी हिट केली. त्यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले.
पळून जाऊन केले होते लग्न
पद्मिनी यांनी वयाच्या 21 व्या वर्षी घरातून पळून जाऊन लग्न केले होते. पद्मिनी आणि प्रदीप शर्मा यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीये. दोघांची भेट 'ऐसा प्यार कहा' (1986) चित्रपटाच्या
सेटवर झाली होती. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती पद्मिनी यांचे को-स्टार होते. दिग्दर्शक विजय सदनाहच्या या चित्रपटाचे निर्माता प्रदीप शर्मा होते. पद्मिनी यांच्या कुटुंबीयांना प्रदीप शर्मासोबतचे नाते
पसंत नव्हते. यामागचे कारण होते, दोघे वेगळे धर्माचे होते.
दोघांनी पद्मिनीच्या कुटुंबीयांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु ते लग्नासाठी तयार झाले नाही. अखेर एकेदिवस पद्मिनी प्रदीपसोबत पळून गेल्या आणि 14 ऑगस्ट 1986ला दोघांनी लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि त्याचे नाव प्रियांक आहे.
प्रिन्स चार्ल्सला केले होते किस
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे बी टाऊनची अशा एक अभिनेत्री आहेत, ज्यांचे अनेक चित्रपट वादाच्या भोव-यात अडकले आहेत. पद्मिनी रिलप्रमाणेच रिअल लाइफमध्येसुद्धा वादाच्या भोव-यात अडकल्या
आहेत. त्यांनी केलेले किस आजही बॉलिवूडच्या इतिहासातील वादग्रस्त किस म्हणून ओळखले जाते. 1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स भारत भेटीवर आले होते. त्यावेळी प्रिन्स चार्ल्स यांच्या चौहोबाजूने झेड
सिक्युरिटी होती. मात्र कुणाचीही पर्वा न करता पद्मिनी यांनी प्रिन्स यांच्या गालाचे चुंबन घेतले होते. या घटनेची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.
लता मंगेशकर यांच्या आहेत नातेवाईक
पद्मिनी यांच्या धाकट्या बहिणीचे नाव तेजस्विनी कोल्हापूरे आहे. तिनेही काही चित्रपटांत काम केले आहे. त्यांच्या दुस-या बहिणीचे नाव शिवांगी आहे. ती अभिनेता शक्ती कपूर यांची पत्नी आहे. पद्मिनी
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रध्दा कपूरची मावशी आहे. पद्मिनी यांचे वडील पंढरीनाथ कोल्हापूरे शास्त्रीय संगीतकार होते आणि आई एअरलाइन्समध्ये नोकरी करायच्या. लता मंगेशकर यांचे वडील
दीनानाथ मंगेशकर त्यांचे नातेवाईक होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.