आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंडियन आयडॉल 12 या शोमध्ये या आठवड्यात दोन दिग्गज अभिनेत्री हजेरी लावणार आहेत. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि पूनम ढिल्लन या कार्यक्रमात पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. यावेळी मंचावर पवनदीपने 'होगा तुमसे प्यार कौन' आणि 'ये जमीन..' ही दोन गाणी सादर केली. विशेष म्हणजे त्याची ही गाणी ऐकल्यानंतर पद्मिनी यांनी ऋषी कपूर यांची एक आठवण सगळ्यांसोबत शेअर केली. यावेळी बोलताना ऋषी कपूर यांनी दोन वेळा माझा आगीतून प्राण वाचवला असे त्यांनी सांगितले. दोनदा आगीतून वाचवले
शोमध्ये ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलताना पद्मिनी यांनी खुलासा केला की, 'होगा तुमसे प्यारा कौन’ या गाण्याचे चित्रीकरण सुरु असताना संपूर्ण सेटला आग लागली होती. त्यावेळी ऋषी कपूर यांनी माझे प्राण वाचवले होते. इतकंच नाही तर 'प्रेमरोग'च्यावेळी देखील असाच प्रसंग घडला होता. तेव्हादेखील सेटला आग लागली होती. मात्र, त्यावेळीदेखील ऋषी कपूर यांनी माझे प्राण वाचवले होते.
पुढे त्या म्हणाल्या, 'ऋषी कपूर केवळ दिग्गज अभिनेताच नव्हते, तर ते उत्तम व्यक्तीदेखील होते. इतरांना मदत करण्यासाठी ते कायम सज्ज असायचे. दोन वेळा त्यांनी माझे प्राण वाचवले त्यामुळे त्यांच्याप्रती असलेला माझा आदर दुप्पटीने वाढला.' ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी कर्करोगामुळे निधन झाले होते.
वयाच्या 10 व्या वर्षी सुरु केले होते करिअर
पद्मिनी यांनी वयाच्या दहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून 'इश्क इश्क इश्क' या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी 'सत्यम शिवम सुंदरम्', 'साजन बिना ससुराल', 'थोडी सी बेवफाई' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. 1980 मध्ये आलेल्या 'इंसाफ का तराजू' या चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी 'जमाने को दिखना है' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी 'प्रेमरोग', 'विधाता', 'प्यार झुकता नहीं', 'सौतन', 'वो सात दिन', 'स्वर्ग से सुंदर', 'प्यार के काबिल', 'दाता', 'फटा पोस्टर निकला हीरो' या चित्रपटांमध्ये काम केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.