आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये आणखी एक लग्न:निर्माते करीम मोरानींची मुलगी होणार आहे पद्मिनी कोल्हापुरेंची सून, कोर्ट मॅरेजनंतर ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने होणार आहे लग्नसोहळा

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियांक आणि शाजा एका महिन्याच्या अंतराने तीनदा लग्न करणार आहेत.

वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्यानंतर बॉलिवूडचे आणखी एक कपल आपल्या नात्याचे लग्नात रुपांतर करत आहे. आम्ही बोलतोय ते ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा आणि निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शाजा मोरानी यांच्याबद्दल... खास गोष्ट म्हणजे प्रियांक आणि शाजा एका महिन्याच्या अंतराने तीनदा लग्न करणार आहेत.

4 फेब्रुवारी रोजी पहिले लग्न

प्रियांक शर्मा आणि शाजा मोरानी यांचे पहिले लग्न 4 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. दोघेही नोंदणी पद्धतीने विवाह करतील. दुसर्‍याच दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारीला हे दोघे पावना लेकजवळ हिंदू पद्धतीने सप्तपदी घेतील आणि त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात मालदीवमध्ये ख्रिश्चन पद्धतीने त्यांचे लग्न होणार आहे.

शाजाच्या वडिलांनी दिला वृत्ताला दुजोरा
करीम मोरानी यांनी दिव्य मराठीसोबत बोलताना आपल्या मुलीच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "ही बातमी पक्की आहे. कोविडचे वातावरण असल्याने आम्ही मोजक्या पाहुण्यांना बोलवू आणि पार्टी करू. हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी असल्याने पहिले लग्न नोंदणी पद्धतीने घरीच होणार आहे. मालदीवचे अद्याप िनश्चित झालेले नाही. कोविड मुळे घरातील लोकांनाच आमंत्रण असेल. पावना लेकवर 5 फेब्रुवारी रोजी फेरे होतील. यावरही सध्या चर्चा सुरु आहे."

शक्ती कपूर यांनीही पुष्टी केली

प्रियंका शर्माचे काका (मावशीचे पती) शक्ती कपूरने यांनी लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाला की, प्रियांक आणि शाजाचे लग्न होणार आहे. शक्ती म्हणाले, "लग्नाच्या तयारीबद्दल फारसं काही माहिती नाही, पण तयारी सुरु आहे.' सध्या लखनौमध्ये शूटिंग करत असल्यामुळे तयारीबद्दल फारशी माहित नसल्याचे शक्ति कपूर यांनी यावेळी सांगितले. सोबतच मुलगी श्रद्धा कपूरच्या लग्नाचे वृत्त चुकीचेही असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मावस भाऊ आहे प्रियांक
प्रियांक आणि शजा यांचा गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात साखरपुडा झाला होता. हे दोघेही 2018 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. श्रद्धा कपूचा भाऊ सिद्धांतने सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले होते. ‘तुम्हा दोघांसाठी मी खूप खुश आहे. माझ्या सर्वांत आवडत्या जोडीचं लवकरच लग्न होणार आहे’, असे कॅप्शन त्याने दिले होते. या साखरपुड्याला शक्ती कपूर, सिद्धांत आणि शिवांगी कोल्हापुरे यांनी हजेरी लावली होती. शक्ती कपूर यांची पत्नी शिवांगी कोल्हापुरे ही पद्मिनी कोल्हापुरेची बहीण आहे. तर प्रियांक हा अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मावस भाऊ आहे.

प्रियांक अभिनेता तर शाजा आहे सहाय्यक दिग्दर्शिका

प्रियांकने चित्रपटात येण्यापूर्वी नादिरा बब्बर यांचा ग्रुप, नीरज काबी आणि सलीम आरिफ यांच्याबरोबर थिएटर केले आहे. त्याने रवि किशन यांची मुलगी रीवा सोबत 'सब कुशल मंगल है' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

शजाने 'ऑलवेज कभी कभी' आणि 'हॅपी न्यू इयर' या चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. मागील वर्षी शजा, तिची बहीण जोआ आणि वडील करीम मोरानी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे काही दिवस त्यांना रुग्णालयात राहावे लागले होते.

बातम्या आणखी आहेत...