आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Pakistan Adnan Siddiqui Apology To Family Of Bollywood Actor Irrfan Khan And Sridevi; Read Full Pakistani Actor Adnan Siddiqui's Statement

माफीनामा:इरफान खान-श्रीदेवीच्या मृत्यूची चेष्टा करणा-या पाकिस्तानी अँकरची  दिलगिरी , म्हणे दिलगिरी व्यक्त करणारा माणूस मोठा असतो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चेष्टा करणा-या अँकरचे नाव अमीर लियाकत असे आहे.

पाकिस्तानच्या एक शोमध्ये पाकिस्तानी अँकरने भारतातील सुपरस्टार श्रीदेवी आणि इरफान खान यांच्या मृत्यूची जणू चेष्टाच केली, निमित्त होतं ते अदनान सिद्दीका यांच्या मुलाखतीचं. या पाकिस्तानी अभिनेत्याने या दोन्ही दिग्गजांसोबत काम केलं आहे, त्यामुळे चेष्टेनं बोलतांना बरं झालं अदनानने राखी आणि बिपाशा सोबत काम केलं नाही त्यामुळं त्यांचा जीव वाचला असं तो अँकर म्हणाला. जीवे पाकिस्तान नावाच्या एका शोमध्ये अदनानची ही  मुलाखत झालीये. या चेष्टा करणा-या अँकरचे नाव अमीर लियाकत असे आहे.

आमिरने व्हिडिओ पोस्ट करुन मागितली माफी :

व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आमिरवर टीका सुरु झाली आणि त्याच्या देशावरही टीका सुरु झाली, यानंतर आमिरला सुबुद्धी आली आणि त्यानं एक व्हिडिओ बनवत लाइव्हमध्ये अशा पद्धतीनं गप्पा होवून जातात, मात्र मी यासाठी दिलगीर असल्याचं सांगितलं. मी या मुलाखतीत प्रेमाबाबतही बोललो होतो मात्र त्याकडं कुणीही पाहिलं नसल्याचं आमिरच म्हणणं आहे. सोबतच माफी मागणारा मोठा असतो अशी आश्चर्यजनक टिप्पणीही त्यानं केली. 

आमिर हे बोलत असताना अदनानही थोडा विचलीत झाला होता, त्यानं अदनानला बोलताना थांबवण्याचाही प्रयत्न केला, मात्र आमिर नॉन स्टॉप बोलत असल्यानं अदनानसुद्धा  हतबल झाला.  बाहेर तुम्ही ज्यांच्या सोबत काम करता ते जगातून निघून जातात असेही खळबळजनक विधान आमिरने यावेळी केल.  आमिरच्या या शोची क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली, त्यानंतर अदनानने सोशल मीडियावर स्वतःचा माफीनामा टाकला.  अदनानने इरफान खानसोबत  'ए माईटी हार्ट' आणि  श्रीदेवीसोबत 'मॉम' या चित्रपटात काम केलं होतं. 

इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना अदनानने इरफान आणि श्रीदेवीच्या कुटुंबीयांकडे याबाबत दिलगिरी व्यक्त केली. त्यात लिहिताना  तो म्हणाला,  मला काय वाटते आणि काय म्हणायचे आहे हे देखील मला माहित नाही. ते कसे व्यक्त करावे हे मला कळत नाहीये ,  मला या शोमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आले होते आणि दुर्दैवाने ही घटना घडली. आमिरने विनोदपूर्वक जे सांगितले ते अतिशय संवेदनशील होते. कारण हे नाही की ते दोघेही माझे जवळचे होते, परंतु मानवतेच्या दृष्टिकोनातून देखील हे चुकीचे आहे. ही खूप चुकीची निवड होती. ज्यामुळे त्याच्याशिवाय माझी आणि संपूर्ण देशाची प्रतिमा कलंकित झाली आहे. मी दोन्ही  कुटुंब आणि दोघांच्या चाहत्यांची दिलगिरी व्यक्त करतो.  यातून मला एक धडा मिळाला आहे, यापुढे मी कोणत्याही कार्यक्रमात अशा गोष्टी सहन करणार नाही असेही अदनान म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...