आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमधील पुरामुळे कोक स्टुडिओ गायक बेघर:वहाब अली बुगती कुटुंबासह आले रस्त्यावर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय पाकिस्तानी गायक वहाब अली बुगती सध्या अडचणींचा सामना करत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे वहाब बेघर झाले आहेत. एका यूजरने वहाब यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ते त्याच्या कुटुंबासोबत अतिशय वाईट परिस्थितीत दिसत आहेत. हे दृश्य पाहिल्यानंतर गायकाचे चाहते सोशल मीडियावर लोकांना मदतीचे आवाहन करत आहेत. कोक स्टुडिओवर 'काना यारी' हे प्रसिद्ध गाणे गाऊन वहाब यांनी चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे.

'काना यारी' फेम गायकाची पुरामुळे वाईट परिस्थिती झाली आहे.
'काना यारी' फेम गायकाची पुरामुळे वाईट परिस्थिती झाली आहे.

घर नसल्याने उघड्यावर जीवन जगावे लागत आहे
वहाब यांच्या सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये ते घर वाहून गेल्याने उघड्यावर मुलांसोबत बसलेला दिसत आहेत. वहाब यांचे आयुष्य चांगले सुरु होते, पण अचानक आलेल्या पुराने सर्व काही उद्ध्वस्त केले.

घर वाहून गेल्याने वहाब यांनी आपल्या कुटुंबासह रस्त्यावर संसार थाटला आहे.
घर वाहून गेल्याने वहाब यांनी आपल्या कुटुंबासह रस्त्यावर संसार थाटला आहे.

कोण आहे वहाब अली बुगती?
वहाबबद्दल बोलायचे झाले तर ते पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील नसीराबादचे रहिवासी आहेत. ते एक बलुची पाकिस्तानी गायक आहेत. त्यांचे लग्न झाले असून त्यांना समीर खान नावाचा मुलगा आहे. गायक होण्याचा प्रवास त्यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. जेव्हा त्यांना व्यावसायिक रेकॉर्डिंग मिळत नव्हते तेव्हा त्यांनी पारंपरिक वाद्ये वाजवून गाणे सुरू केले. संगीताच्या दुनियेत आपला ठसा उमटवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.

कोक स्टुडिओतून मिळाली वहाब यांना खरी ओळख
वहाब यांना खरी ओळख 2022 मध्ये पाकिस्तानी टीव्ही सीरिज कोक स्टुडिओमधून मिळाली, जिथे त्यांनी 'काना यारी' हे प्रसिद्ध गाणे गायले. शोमध्ये परफॉर्म केल्यानंतर वहाब प्रकाशझोतात आले आणि तेव्हापासून त्यांचा प्रसिद्धीपर्यंतचा प्रवास सुरू झाला. वहाब यांचे एक यूट्यूब चॅनेल आहे असून त्यावर ते त्यांचे संगीत व्हिडिओ अपलोड करत असतात.

बातम्या आणखी आहेत...