आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सहार शिनवारीने सोशल मीडियावर एका ट्वीट केले आहे. तिच्या या ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने तिच्या ट्वीटमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर एजन्सीविरुद्ध तक्रार करायची असल्याचे म्हटले आहे. या ट्वीटला दिल्ली पोलिसांनी उत्तर दिले आहे. दिल्ली पोलिसांच्या या उत्तराने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
काय म्हणाली पाकिस्तानी अभिनेत्री?
सहार शिनवारी या पाकिस्तानी अभिनेत्रीने एक ट्वीट शेअर केले आहे. सहारने ट्वीटमध्ये लिहिले, "दिल्ली पोलिसांची ऑनलाइन लिंक कोणाला माहीत आहे का? माझ्या पाकिस्तान या देशात अराजकता आणि दहशतवाद पसरवणारे भारताचे पंतप्रधान आणि भारतीय गुप्तचर एजन्सी रॉ यांच्याविरोधात मला तक्रार दाखल करायची आहे. मला खात्री आहे की, भारतीय सर्वोच्च न्यायालय मला न्याय देईल." तिच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
दिल्ली पोलिसांनी दिले ट्वीटला उत्तर
सहार शिनवारीच्या ट्वीटला दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून उत्तर देण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटले, "आम्हाला पाकिस्तानमध्ये अधिकार क्षेत्र नाही. पण तुमच्या देशात इंटरनेट बंद असताना तुम्ही कसे ट्वीट करीत आहात? हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल!" असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. त्यांच्या या उत्तराची सगळीकडे चर्चा होत आहे.
इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. त्यांच्या अटकेनंतर इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच तिथे सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात निदर्शने सुरू झाली आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.