आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी चित्रपटाने अनेक भारतीय ब्लॉकबस्टर्सना पछाडले:'द लीजेंड ऑफ मौला जट'ने कमाईत 'RRR' आणि 'KGF-2'ला मागे टाकले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट'ची बॉक्स ऑफिसवर कमाईचा ओघ सुरू आहे. या चित्रपटाने आतापर्यंत वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 220 कोटींचा गल्ला जमवला आहे. या वर्षी प्रदर्शित झालेल्या भारतातील काही ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही त्याने मागे टाकले आहे. यूके आणि नॉर्वे सारख्या देशांमध्ये त्याने RRR, KGF-2 आणि बजरंगी भाईजान सारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. फवाद खान स्टारर चित्रपट हा पाकिस्तान चित्रपट इंडस्ट्रीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

आतापर्यंत 220 कोटींची कमाई झाली आहे

द लिजेंड ऑफ मौला जटने जगभरात 10 मिलियन डॉलर्स म्हणजेच 220 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये 87.50 कोटी रुपये (पाकिस्तानी रुपयांत) देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरून आले आहेत, तर 132.50 कोटी रुपये परदेशातून आले आहेत.

या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाने यूके, नॉर्वे आणि आखाती देशांमध्ये कमाईच्या बाबतीत भारतातील RRR, KGF 2 सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित झाला होता.

भारतीय चित्रपटांना मागे टाकले

यूकेमध्ये या चित्रपटाने 13.92 कोटी रुपयांची कमाई केली आणि दक्षिण आशियातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. याआधी 2018 मध्ये आलेल्या पद्मावत हा चित्रपट यूकेमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्येही चित्रपटाची चांगली कमाई होत आहे.

हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता
हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता

भारतातही रिलीज होणार असल्याचे आले होते वृत्त
23 डिसेंबरला हा चित्रपट भारतातही प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 2019 पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सांस्कृतिक बंदी आहे. भारतीय चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होत नाहीत आणि पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होत नाहीत. हा चित्रपट पाकिस्तानी चित्रपट इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. पाकिस्तानातही आजपर्यंत एवढा महागडा चित्रपट कोणी बनवला नाही.

फवाद खान आणि माहिरा खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
फवाद खान आणि माहिरा खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

फवादने बॉलिवूडमध्येही केले आहे काम

बिलाल लाशारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत तर हमजा अली अब्बासी सहाय्यक भूमिकेत आहे. द लीजेंड ऑफ मौला जट हा 1979 चा कल्ट क्लासिक चित्रपट मौला जटचा रिमेक आहे. चित्रपटाचा मुख्य अभिनेता फवाद खान पाकिस्तानातच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध आहे. त्याने यापूर्वी 'खूबसूरत', 'कपूर अँड सन्स' आणि 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...