आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:आई श्वेता तिवारीच्या प्रेग्नेंसीबद्दल कळल्यानंतर 'अशी' होती पलक तिवारीची प्रतिक्रिया, म्हणाली - सोनाग्राफीत बाळाला बघून...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी हिने अलीकडेच सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. एका मुलाखतीत पलकने सांगितले की, ती 15 वर्षांची असताना तिला तिच्या आईच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीविषयी समजले होते.

पलकने सांगितल्यानुसार, ही बातमी ऐकल्यानंतर ती गोंधळली होती. मात्र जेव्हा ती तिच्या आईसोबत हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिने सोनोग्रफीत बाळाची हालचाल बघितली, तेव्हा तिला रडूच कोसळले. हाच टर्निंग पॉइंट ठरला होता, असे पलक म्हणाली.

मी या बातमीसाठी तयार नव्हते - पलक
आई श्वेता तिवारी दुसऱ्यांदा आई होणार आहे हे कळल्यावर पलकला कसे वाटले होते, याचा खुलासा पलकने नुकताच केला आहे. पलकने सांगितले की, जेव्हा तिला पहिल्यांदा तिच्या आईच्या दुसऱ्या गरोदरपणाबद्दल कळाले तेव्हा तिला काहीच समजले नव्हते.

पलक म्हणाली, "मला आठवतंय त्यावेळी मी 15 वर्षांची होते. माझी आई मला म्हणाली, आम्हाला बाळ होणार आहे. तर मी मान हलवत नाही, नाही, नाही असे म्हणाले. तू नाही का म्हणतेस, असे आईने मला विचारले. त्यावर मी म्हणाले, मी नवीन सदस्याच्या घरात येण्याबद्दल तयार नव्हते. मला कुणीच सांगितले नाही. माझे वागणे पाहून आई म्हणाली- तुझी ओव्हरअ‍ॅक्टिंग बंद कर."

सोनोग्राफीत बाळाची हालचाल पाहून पलकला कोसळले होते रडू
पलक पुढे म्हणाली, 'मी माझ्या आईसोबत सोनोग्राफीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. जेव्हा मी पहिल्यांदा बाळाला हलताना पाहिले तेव्हा मला रडू कासळले. मी थरथर कापत होते. त्याक्षणी असे वाटले जणू की, या बाळापेक्षा माझे या जगात इतर कोणावरही प्रेम नाही.'

27 नोव्हेंबर 2016 रोजी श्वेता तिवारीचा मुलगा रेयांशचा जन्म झाला. रेयांशचे वडील अभिनव कोहली आणि श्वेता आता वेगळे राहतात.

राजा चौधरी आहे पलकचे बायोलॉजिकल वडील
पलकच्या वडिलांचे नाव राजा चौधरी आहे. श्वेता तिवारीने 1999 मध्ये राजा चौधरीशी लग्न केले होते. त्यानंतर 8 ऑक्टोबर 2000 मध्ये पलकचा जन्म झाला, राजा चौधरीचे दारुचे व्यसन आणि घरगुती हिंसाचारामुळे श्वेताने 2007 राजा चौधरीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर पलकची कस्टडी श्वेताला मिळाली. त्यानंतर 2013 मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले. पण तिचे दुसरे लग्नही फक्त 9 वर्षे टिकलं. श्वेताने 2022 मध्ये अभिनवपासून घटस्फोट घेतला. आता ती एकटीच पलक व मुलगा रेयांशचा सांभाळ करत आहे.