आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध संतूर वादकावर आज होणार अंत्यसंस्कार:जया आणि अमिताभ बच्चन पंडित शिवकुमार शर्मा यांच्या घरी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मंगळवारी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पंडित शिवकुमार हे 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते. आज दुपारी तीन वाजता मुंबईतील विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सध्या त्यांचे पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांना आदरांजली वाहिली.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांना आदरांजली वाहिली.

शिवकुमार शर्मा यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक सिनेसृष्टीतील कलाकार त्यांच्या घरी पोहोचत आहेत. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शबाना आझमी, जावेद अख्तर यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांनी पंडित शिवकुमार शर्मा यांनी श्रद्धांजली दिली. ईला अर्जून आणि हरिहरनसारखे दिगग्ज देखील त्यांच्या शर्मा यांच्या कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी झाले.

याच्या 5 व्या वर्षापासून संगीताचे धडे

पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी जम्मू येथे झाला. त्यांचे वडील पं. उमदत्त शर्मा हे सुप्रसिद्ध गायक होते, संगीत त्यांच्या रक्तातच होते. पं. शर्मा यांचे संगीत शिक्षण वयाच्या पाचव्या वर्षी सुरू झाले. त्यांच्या वडिलांनी त्यांना सूर साधना आणि तबला या दोन्हीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी संतूर शिकायला सुरुवात केली. संतूर हे जम्मू-काश्मीरचे लोक वाद्य होते, त्याला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवण्याचे श्रेय पं. शिवकुमार यांना जाते.

1955 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी पहिला शो

1955 मध्ये वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर वादनाचा पहिला शो मुंबईत केला. यानंतर त्यांनी संतूरच्या तालावर संगीताच्या एका नव्या आवाजाची ओळख जगाला करून दिली. बासरीवादक पं.हरिप्रसाद चौरसिया यांना शास्त्रीय संगीतात साथ दिली. दोघांनी 1967 मध्ये एकत्र काम करायला सुरुवात केली आणि शिव-हरी नावाने एक जोडी तयार केली.

शिव-हरीच्या जोडीचा प्रवास

संतूर वादक पं.शिवकुमार शर्मा आणि बासरीवादक पं.हरिप्रसाद चौरसिया हे त्यांच्या जुगलबंदीसाठी प्रसिद्ध होते. 1967 मध्ये, दोघांनी पहिल्यांदा शिव-हरी नावाचा शास्त्रीय अल्बम तयार केला. अल्बमचे नाव होते 'कॉल ऑफ द व्हॅली'.

त्यानंतर त्यांनी एकत्र अनेक म्युझिक अल्बम केले. यश चोप्रांनी शिव-हरीच्या जोडीला चित्रपटांमध्ये पहिला ब्रेक दिला. 1981 मध्ये आलेल्या सिलसिला चित्रपटात शिव-हरीच्या जोडीने संगीत दिले होते. या दोघांनी यश चोप्राच्या चार चित्रपटांसह एकूण आठ चित्रपटांना संगीत दिले.

सिलसिला (1987)

फासले (1985)

विजय (1988)

चांदनी (1989)

लम्हे (1991)

परंपरा (1993)

साहिबान (1993)

डर (1993)

बातम्या आणखी आहेत...