आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलविदा पंडितजी:संगीत मार्तंड पंडित जसराज पंचत्वात विलीन, मुंबईत शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्सोवास्थित निवासस्थानी पंडितजींचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
  • पंडित जसराज यांचे 17 ऑगस्ट रोजी वयाच्या 90 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • पद्मविभूषण पंडित जसराज मागील काही काळापासून आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेत वास्तव्याला होते.

ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित जसराज गुरुवारी पंचत्वात विलीन झाले. मुंबईतील विले पार्ले स्थित पवनहंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. मुंबई पोलिसांच्या जवानांनी त्यांना सलामी दिली होती. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देवकी पंडित, शारंग देव पंडित, भजन सम्राट अनूप जलोटा, संगीतकार ललित पंडित यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर पोहोचले होते.

यापूर्वी वर्सोवास्थित निवासस्थानी पंडितजींचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पंडित जसराज यांच्या अंत्य विधीचे सोशल मीडियावर लाइव्ह टेलिकास्ट झाले. फेसबुकवर आर्ट अँड आर्टिस्ट आणि दुर्गा जसराज, सारंग देव, मधुरा जसराज आणि पंडित जसराज फॅन्स पेजवर हे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात आले होते. पंडितजींचे 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.15 वाजता न्यू जर्सी येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव बुधवारी विशेष विमानाने मुंबईला पोहोचले होते.

या छायाचित्रात पत्नी मधुरा जसराज, मुलगी दुर्गा जसराज आणि मुलगा शारंग देव पद्म विभूषण पंडित जसराज यांना अखेरचा निरोप देताना दिसत आहेत.
या छायाचित्रात पत्नी मधुरा जसराज, मुलगी दुर्गा जसराज आणि मुलगा शारंग देव पद्म विभूषण पंडित जसराज यांना अखेरचा निरोप देताना दिसत आहेत.
गायक अनूप जलोटा यांनी पंडित जसराज यांचे अंत्य दर्शन घेतले.
गायक अनूप जलोटा यांनी पंडित जसराज यांचे अंत्य दर्शन घेतले.
संगीतकार ललित पंडित हेदेखील पंडित जसराज यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले.
संगीतकार ललित पंडित हेदेखील पंडित जसराज यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले.
पद्म विभूषण पंडित जसराज यांच्यासोबत त्यांच्या गुरुंचे छायाचित्र ठेवण्यात आले आहे.
पद्म विभूषण पंडित जसराज यांच्यासोबत त्यांच्या गुरुंचे छायाचित्र ठेवण्यात आले आहे.
पंडित जसराज यांचे पार्थिव शरीर या विशेष वाहनातून एअरपोर्टहून त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.
पंडित जसराज यांचे पार्थिव शरीर या विशेष वाहनातून एअरपोर्टहून त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.
पंडित जसराज यांच्या पार्थिवासोबत त्यांचे शोकाकुल कुटुंबीय
पंडित जसराज यांच्या पार्थिवासोबत त्यांचे शोकाकुल कुटुंबीय

पंडित जसराज यांची वयाच्या 90 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. पद्म विभूषण पंडित जसराज काही काळापासून आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेत वास्तव्याला होते.

  • विशेष विमानाने पार्थिव मुंबईत आणले गेले

एयर इंडियाच्या विमान एआई 144 ने न्यू जर्सीहून पंडितजींचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले होते. विमान बुधवारी दुपारी मुंबईत पोहोचले. त्यानंतर अंधेरी (पश्चिम) च्या वर्सोवास्थित निवासस्थानी अंत्य दर्शनासाठी पंडितजींचे पार्थिव ठेवण्यात आले आहे. कुटुंबीयांचे प्रवक्ते प्रीतम शर्मा यांनी सांगितल्यानुसार, पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरी, मुलगी दुर्गा, मुलगा सारंग आणि नातवंड यावेळी उपस्थित होते.

पंडित जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज आणि मुलगा सारंग देव
पंडित जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज आणि मुलगा सारंग देव