आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक भाषेत काम करणार नाही:पंकज त्रिपाठी म्हणाले - माझे संवाद दुसऱ्याने डब केलेले मला आवडत नाहीत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शेरदिल: द पिलीभीत सागा'मध्ये झळकणार

अभिनेते पंकज त्रिपाठी सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'शेरदिल: द पिलीभीत सागा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा हा चित्रपट 24 जूनला प्रदर्शित होणार आहे. प्रमोशन दरम्यानच पंकज यांनी स्पष्ट केले की, त्यांना अशा कोणत्याही भाषेत चित्रपट किंवा वेब शोमध्ये काम करायला आवडत नाही, ज्यात ते कम्फर्टेबल नसतात. यासोबतच कोणत्याही प्रादेशिक भाषेतील चित्रपटात काम करणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

माझा अभिनय माझ्या आवाजाशिवाय अपूर्ण आहे
मुलाखतीत पंकज यांनी सांगितले की, मला अशा भाषेतील चित्रपट आणि शो करणे आवडत नाही, ज्यामध्ये मला कम्फर्टेबल नाही. माझे संवाद दुस-याने डब केलेले मला आवडत नाही. कारण माझा आवाज माझ्या अभिनयाला आणि अभिव्यक्तीला पूरक आहे. त्याशिवाय माझी भूमिका अपूर्ण आहे.

याच मुलाखतीत जेव्हा त्यांना विचारण्यात आले की तुम्ही बंगाली चित्रपट करणार का? यावर उत्तर देताना पंकज म्हणाले, मला बंगाली भाषा पूर्णपणे समजते पण मला ती फारशी बोलता येत नाही. बंगाली व्यक्तिरेखा साकारण्यासाठी हे पुरेसे नाही. होय, बंगाली चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा जर हिंदी भाषिक असेल तर मला असा चित्रपट करायला नक्कीच आवडेल.

'शेरदिल'मध्ये पत्नीने साकारला कॅमिओ
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पंकज यांनी सांगितले की, माझी पत्नी मृदुला 'शेरदील' चित्रपटातून पदार्पण करत आहे. तिने चित्रपटात एक सीन केला आहे. दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी यांनी तिला ही भूमिका करण्यास सांगितले. चित्रपटात सुंदर बंगाली साडी नेसायला मिळणार असल्याने मृदुलाने लगेचच चित्रपटात काम करण्यास होकार दिला. मात्र, त्यासाठी तिने मानधन घेतले नाही.

'शेरदिल: द पिलीभीत सागा'मध्ये झळकणार
पंकज त्यांच्या आगामी 'शेरदिल: द पिलीभीत सागा' या चित्रपटात गावच्या प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीजीत मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 24 जून रोजी प्रदर्शित होत आहे. याशिवाय ते 'फुकरे 3'मध्ये दिसणार आहे. पुढील आठवड्यापासून पंकज त्यांच्या मिर्झापूर या वेब सिरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यामध्ये ते कलीन भैयाच्या भूमिकेत दिसणार आहेत.