आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अक्षय कुमारच्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी यांची एंट्री झाली आहे. पंकज पहिल्यांदाच अक्षयसोबत मोठ्या पडद्यावर स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. अक्षय आणि पंकज यांच्यासह अर्शद वारसी आणि जॅकलिन फर्नांडिस या चित्रपटाचा भाग आहेत. अक्षय आणि किर्ती सेनन चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
यापूर्वी, पंकज यांनी किर्ति सेननसह 'लुका छुपी' या चित्रपटात काम केले आहे. पंकज आणि अक्षय दोघेही त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी परिचित आहेत. त्यामुळे या दोघांनाही पडद्यावर एकत्र बघणे चाहत्यांसाठी एक ट्रीट ठरेल. पंकज जानेवारी महिन्यात अक्षय, किर्ती, अर्शद आणि जॅकलिन यांच्यासह जैसलमेरमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणावर रुजू होतील.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही
'बच्चन पांडे' ही गँगस्टर ड्रामा बेस्ड कॉमेडी अॅक्शन फिल्म आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अर्शद वारसी अक्षयच्या राइड हँडच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर किर्ती सेनन पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद संभाजी असून निर्माते साजिद नाडियाडवाला आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. पुढील वर्षी 2021 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.