आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Pankaj Tripathi Life Facts Stayed In Jail For 7 Days For Speaking Against The Government, Worked As A Cook In A Hotel, Played The Role Of A Girl In Village Plays

46 वर्षांचे झाले कालिन भईया:सरकारविरोधात आवाज उठवल्याने 7 दिवस राहावे लागले होते तुरुंगात, हॉटेलमध्ये केले होते कुकचे काम

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मिर्झापूरचा कालिन भईया असे किंवा सेक्रेड गेम्समधील गुरुजी... प्रत्येक पात्रात जीव ओतणारे पंकज त्रिपाठी आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. पंकज त्रिपाठींच्या करिअरची सुरुवात रन या चित्रपटाने झाली. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक चित्रपट दिले. मिर्झापूर या वेब सिरीजमध्ये ते कालिन भईया झाले, तेव्हा लोक त्यांना त्याच नावाने ओळखू लागले. पंकज आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्रात जीव आणतात.

पंकज यांचा जन्म बिहारमधील बेलसंड गावात झाला. वडिलांप्रमाणेच पंकजही सुरुवातीच्या काळात भिक्षुकी आणि शेती करायचे. त्यानंतर गावात होणाऱ्या नाटकांमध्ये मुलीचे पात्र साकारुन त्यांनी अभिनय कौशल्य दाखवायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी त्यांना अभिनेता होण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे वडिलांनी त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाटण्याला पाठवले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान पंकज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले. यादरम्यान राज्य सरकारविरोधात आवाज उठवल्याबद्दल त्यांना 7 दिवस तुरुंगात काढावे लागले होते.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत मनोज बाजपेयी यांना पाहून अभिनेता होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, त्यामुळे त्यांनी अभिनय शिकण्यास सुरुवात केली आणि खर्चासाठी हॉटेलमध्ये कुक बनले. तेथे दोन वर्षे घालवल्यानंतर ते दिल्ली आणि नंतर मुंबईला गेले. चला तर मग हे यश मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षावर एक नजर टाकूया.

झाडाखाली बसून पूर्ण केले शालेय शिक्षण

पंकज त्रिपाठी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1976 रोजी बिहारमधील बेलसंड गावात एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील शेतीचे काम आणि भिक्षुकी करायचे. पंकजचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या गावात शाळा, दिवे यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव होता. त्यामुळे त्यांनी शालेय शिक्षण झाडाखाली पूर्ण केले. पंकजच्या कुटुंबात आई-वडिलांशिवाय 3 भावंडे होती.

गावातल्या नाटकात मुलीचा अभिनय

पंकज त्रिपाठी यांनी लहानपणापासूनच वडिलांना शेतीत मदत केली. त्यानंतर अकरावीत आल्यावर त्यांनी गावाकडच्या नाटकांमध्ये स्त्री पात्र साकारायला सुरुवात केली. गावातील लोकांना त्यांचा अभिनय खूप आवडला आणि गमतीने त्यांना बॉलिवूडमध्ये जाण्याचा सल्ला द्यायचा, इथून पंकज यांची अभिनयातील रुची आणखी वाढली. ते मनोज बाजपेयींचे खूप मोठा चाहते होते आणि त्यांच्यासारखा अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहिले होते.

वडिलांनी डॉक्टर होण्यासाठी घरापासून दूर पाठवले

पंकज त्रिपाठींच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनी डॉक्टर व्हावे. त्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण होताच त्यांनी पंकजला पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवले. यानंतर पंकज हाजीपूरला आले आणि इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला. मात्र, अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांचे ध्येय होते. येथील महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान ते नाट्यक्षेत्रातही सक्रिय होऊ लागले.

सरकारविरोधात आवाज उठवल्याने 7 दिवस तुरुंगात काढावे लागले

महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान, पंकज राजकारणातही सक्रिय झाले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा भाग बनले. त्यावेळी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे सरकार होते. 1993 चे साल होते, एकदा त्यांनी त्यांच्या पक्षासोबत राज्य सरकारविरोधात आवाज उठवला होता. यानंतर त्यांना 7 दिवस तुरुंगात जावे लागले.

अभ्यासानंतर हॉटेलमध्ये कुकची नोकरी

शिक्षणानंतर पंकज त्रिपाठी पाटणा येथील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करू लागले. या काळात ते नाट्यक्षेत्रातही सक्रिय होते. सुमारे दोन वर्षे येथे काम केल्यानंतर ते दिल्लीला गेले. दिल्लीत त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. पंकज यांनी सांगितले की, अभिनयात यश मिळणार नाही या भीतीने त्यांनी हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. पंकज यांना जेवण बनवायला फार आवडते.

दिल्ली ते मुंबईचा प्रवास

दिल्लीतून अभिनयाचा कोर्स करून पंकज त्रिपाठी मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांना इथेही संघर्षाला सामोरे जावे लागले. ते बिहारचे होते आणि भोजपुरी ही त्यांची भाषा होती. अशा परिस्थितीत त्यांना हिंदी आणि इंग्रजी शिकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. यानंतर 2004 मध्ये त्यांना रन चित्रपटात छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील पंकज त्रिपाठीला तुम्ही ओळखतही नसाल. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या.

गँग्स ऑफ वासेपूरमधून मिळाली ओळख

अनेक चित्रपट करूनही पंकज त्रिपाठींना ओळख मिळाली नाही. पण गँग्स ऑफ वासेपूरमधून ते घराघरांत पोहोचले, यातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. यानंतर ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या मिर्झापूरमधील कालिन भईयाच्या भूमिकेतून ते लाइमलाइटमध्ये आले.

लग्न समारंभात जडले प्रेम

एका लग्नसोहळ्यात 17 वर्षीय पंकज मृदुलाच्या प्रेमात पडले होते. मात्र ही प्रेमकथा लग्न मंडपापर्यंत सहजासहजी पोहोचली नाही. पंकज यांच्या बहिणीचे लग्न मृदुलाच्या भावाशी झाले होते आणि त्यांच्या घरच्या परंपरेनुसार ते आपल्या बहिणीच्या नंणदेशी लग्न करू शकत नव्हते. पण पंकजदेखील कुणाचे ऐकणार होते, ते तर मृदुलाच्या प्रेमात पडले होते. अशा परिस्थितीत घरच्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले, पण त्यांनी घरच्यांची समजूत काढली. कुटुंबाने सहमती दिल्यानंतर 15 जानेवारी 2004 रोजी दोघांनी लग्न केले. या जोडप्याला आशी नावाची मुलगी आहे.

न्यूटनसाठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. न्यूटन चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, लुडो चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट अकादमी पुरस्कार आणि मिमीसाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पूर्वी स्टुडिओत प्रवेश मिळत नव्हता, आता अनेक ऑफर

पंकज त्रिपाठी आज 46 वर्षांचे झाले. त्यावेळचे किस्से आठवत ते सांगतात की, जेव्हा मी मुंबईला आले तेव्हा सुरक्षा रक्षकांनी मला स्टुडिओत जाऊ दिले नाही आणि निर्माते माझ्याशी बोललेही नाहीत. आता तेच निर्माते त्यांना चित्रपट ऑफर करतात. एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ते 40 कोटींचे मालक आहेत. पंकज सध्या ओह माय गॉड 2 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

बातम्या आणखी आहेत...