आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघर्ष:मुंबईत आल्यानंतर काम नसल्याने 8 वर्षे घरी बसले होते पंकज त्रिपाठी, आज एवढे काम आहे की चित्रपट नाकारावे लागतात 

मुंबई (अंकिता तिवारी)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बर्‍याचदा असे घडले आहे की मला चित्रपट निर्मात्यांना नकार द्यावा लागला आहे कारण माझ्याकडे त्यांना द्यायला तारखा नसतात.

'गँग्स ऑफ वासेपुर' ते 'सेक्रेड गेम्स' आणि 'मिर्झापूर'पर्यंत पंकज त्रिपाठी प्रेक्षकांचा आवडते स्टार झाले आहेत. पंकज दरवर्षी 7 ते 8 चित्रपटांमध्ये झळकत असतात. अलीकडेच दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत पंकज यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीशी संबंधित अनेक रंजक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

  • पूर्वीच्या ऑडिशन आणि आताच्या ऑडिशनमध्ये काय फरक आहे?

गेल्या 4 वर्षांपासून कोणीही माझे ऑडिशन घेतलेले नाही. यापूर्वी जेव्हा जेव्हा मी ऑडिशनला जात असे, तेव्हा लोक मला वेगवेगळ्या मार्गांनी भूमिका करण्यास सांगायचे. मी एक ट्रेंड अभिनेता आहे किंवा कोणती भूमिका कशी साकारायला हवी, हे मला माहित नाही असे मी कधीही सांगितले नाही. पण आता मी या टप्प्यावर पोहोचलो आहे की गेल्या 4 वर्षात मी कोणतेही ऑडिशन दिले नाही.

  • करिअरमधील सर्वात विचित्र ऑडिशन कसे होते?

मी एका डॉनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशनला गेलो होतो जे 2.30 ते 3 तास चालले होते. मला सांगण्यात आले की मी माझा मेकओवर करण्यात येईल आणि मग असे शूट होईल. पण जेव्हा ती रोलमध्ये आलो तेव्हा मला त्या डॉनच्या शिपायाची भूमिका देण्यात आली. 12 तासांत मला फक्त एक शब्द 'हुह' म्हणायचे होते. ती ऑडिशन देताना मला वाटलं की ही खूप मोठी भूमिका आहे आणि कदाचित यामुळे माझं आयुष्य बदलेल पण शूटिंगच्या वेळी सत्य कळलं.

  • निगेटिव्ह कॅरेक्टरमधून पॉझिटिव्ह रोल कसे मिळाले?

सुरुवातीला, मी फक्त नकारात्मक पात्रांसाठी निवडलो जायचो, कदाचित माझा लुक किंवा माझा चेहरा असा असेल. पण 'मसान'मध्ये माझी फक्त तीन मिनिटांची भूमिका पाहिल्यानंतर लोक विचार करू लागले की हाच तो' गँग्स ऑफ वासेपुर 'चित्रपटात सुलतानाची भूमिका करणारा माणूस आहे का? 'मसान' आणि अश्विनी अय्यर तिवारी यांची डेब्यू फिल्म 'निल बट्टे सन्नाटा' ने अचानक माझ्या अभिनय कारकीर्दीत यू-टर्न घेतले. हे असे दोन चित्रपट आहेत ज्यानंतर मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळू लागल्या.

  • आतापर्यंतचे सर्वात कठीण पात्र कोणते होते?

'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमध्ये मी गुरुजीची भूमिका केली होती, ती भूमिका साकारणे माझ्यासाठी खरोखर कठीण होते. सुरुवातीला मी अशा कोणत्याही गुरुजीला ओळखत नव्हतो, त्यामुळे भूमिकेशी रिलेट करणे फार कठीण होते. दुसरे म्हणजे, मला असे वाटते की माझ्या घरीच मला कुणी फॉलो करत नाही, त्यामुळे मी एक गुरुजी आहे आणि माझे एवढे फॉलोअर्स आहेत, हे कठीण होते. भूमिका करत असताना मी नेहमीच असा विचार करायचो की, हे पात्र मी कसे वठवू की जेणेकरुन सगळ्यांचा विश्वास बसेल की मीच गुरुजी आहे. त्या भूमिकेसाठी मी माझ्या दाढीचा त्याग केला, जो मी यापूर्वी कोणत्याही भूमिकेसाठी केला नव्हता.

  • चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी असताना खासगी आयुष्य कसे सांभाळता?

खरं सांगायचं झालं तर मी स्वतः खूप अस्वस्थ आहे. मी स्वतःहून इतके काम घेतले आहे की, आता मला वाटते की माझे काम थोडे कमी करावे. सध्या लॉकडाऊन आहे म्हणून मी माझ्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवू शकतोय, नाहीतर त्यांच्याबरोबर वेळ घालवणे खूप अवघड आहे. आता मी स्वत:  विचार केला आहे की वर्षातून तीन किंवा चार चित्रपट करेन.मी माझ्या कुटूंबाला वेळ देईन आणि आरोग्याकडे लक्ष देईल.

  • तारखांसाठी किती चित्रपट नाकारले जातात?

बर्‍याचदा असे घडले आहे की मला चित्रपट निर्मात्यांना नकार द्यावा लागला आहे कारण माझ्याकडे त्यांना द्यायला तारखा नसतात. आणि कधीकधी असे घडते की चांगले चित्रपटदेखील मला सोडावे लागतात. 365 दिवस असतात आणि मी 365 दिवसांपेक्षा अधिक काम करू शकत नाही. चांगले चित्रपट सोडले म्हणून दुः नाही पण अनेकदा मला चांगल्या प्रोजेक्टला नाही म्हणावे लागते.

  • आपल्या आगामी चित्रपटांसाठी कसे वाटते?

माझ्या आगामी सर्व चित्रपटांसाठी मी उत्सुक आहे, मग तो  '83' किंवा 'गुंजन सक्सेना' असो किंवा' मिर्झापूर पार्ट 2 ' ही वेब सीरिज. मी सर्व भूमिकांसाठी खूप उत्सुक आहे.

बातम्या आणखी आहेत...