आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेते पंकज त्रिपाठी यांनी गुरुवारी त्यांच्या आगामी 'मैं अटल हूं' या चित्रपटाचा बिहाइंड द सीन व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत पंकज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करत चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा व्हिडिओ 'मैं अटल हूं' चित्रपटाच्या सेटवरील आहे. पंकज यांच्या खांद्यावर बॅग दिसत असून त्यांच्या हातात स्क्रिप्ट दिसत आहे. त्यांच्यासह सेटवरील बाकीचे क्रू मेंबर्सही कामात व्यस्त दिसत आहेत.
पंकज यांनी अटलबिहारी वाजपेयी यांनी लिहिलेल्या ओळी शेअर केल्या
BTS व्हिडिओ शेअर करताना, पंकज यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या ओळी लिहिल्या - '‘इंसान बनो, केवल नाम से नहीं, रूप से नहीं, शक्ल से नहीं, हृदय से, बुद्धि से, सरकार से, ज्ञान से। इंसान की परिभाषा बताकर, इंसानियत की भाषा बने थे, श्री अटल बिहारी वाजपेयी जी!' चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होत आहे. हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होईल.
व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सनी दिल्या प्रतिक्रिया
पंकज यांच्या या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री अर्चना पूरण सिंगने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले- 'तुम्हाला अटलबिहारी यांच्या पात्रात पाहण्याची वाट पाहत आहे.' एका चाहत्याने म्हटले- 'मिर्झापूर 3ची सोय करा कालीन भैय्या.' आणखी एकाने लिहिले- 'आजवरचा सर्वोत्तम बायोपिक येत आहे.'
25 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाले चित्रपटाचे मोशन पोस्टर
'मैं अटल हूं' या चित्रपटाचे मोशन पोस्टर 25 डिसेंबर रोजी म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी रिलीज करण्यात आले होते. पोस्टरमध्ये पंकज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लूकमध्ये दिसले.
जूनमध्ये झाली होती या चित्रपटाची घोषणा
या वर्षी 28 जून रोजी निर्मात्यांनी बायोपिकची घोषणा केली होती. तेव्हापासून या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण साकारणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांभाळली आहे. तर कथा लेखक उत्कर्ष नाथानी यांनी लिहिली आहे. हा चित्रपट डिसेंबर 2023 ला प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.