आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कबुलीजबाब:पंकज त्रिपाठींनी तीन वर्षांनंतर बघितली 'मिर्झापूर' सीरिज, म्हणाले- 'दुसरा सीझन यापेक्षा अधिक चांगला वाटेल'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिझी शेड्युलमुळे पंकज त्रिपाठींना एवढे दिवस त्यांची वेब सीरिज बघता आली नव्हती.

पंकज त्रिपाठींची गाजलेली वेब सीरिज 'मिर्झापूर'ला रिलीज होऊन तीन वर्षे झाली आहेत. पहिल्या यशस्वी सीझननंतर चाहते दुस-या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण या सीरिजमध्ये कालीन भैय्याची भूमिका साकारणारे पंकज त्रिपाठी एवढी वर्षे त्यांची वेब सीरिज पाहू शकले नव्हते. मात्र लॉकडाऊन दरम्यान मिळालेल्या निवांत वेळेत त्यांनी आपली सीरिज पाहिली आणि त्याचे कौतुकदेखील केले आहे.

'मिर्झापूर'नंतर पंकज त्रिपाठी त्यांच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये खूप बिझी झाले होते, त्यामुळे ते आपल्या कुटूंबालाही वेळ देऊ शकले नाहीत. हे त्यांनी आपल्या मुलाखतीतही बर्‍याच वेळा सांगितले. सोबतच त्यांनी आतापर्यंत 'मिर्झापूर' वेब सीरिज पाहिली नसल्याचीही प्रामाणिकपणे कबूल दिली होती. तथापि, कोविड -19 च्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा त्यांनी आपली वेब सीरिज पाहिली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले की इतरांबरोबर त्यांनी उत्कृष्ट काम केले. ज्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये एवढा लोकप्रिय झाला.

पंकज त्रिपाठी म्हणतात- जेव्हा आम्ही शूटिंग करत असतो, तेव्हा आम्हाला फक्त स्टोरी लाइन माहित असते. शूटिंग दरम्यान आमचे सर्व लक्ष पात्रावर असते. जेव्हा मी ही कथा ऐकली तेव्हा खूप छान वाटली होती. आता प्रेक्षकांप्रमाणे एकामागून एक भाग पाहण्यात मला मजा आली, कारण एक भाग दुसर्‍या भागाशी चांगला जोडला आहे.

  • यापेक्षा दुसरा सीझन प्रेक्षकांना आवडेल

पंकज म्हणाले की, वेब सीरिज पाहिल्यानंतर आता हे समजले आहे की, लोकांना ही सीरिज एवढी का पसंत पडली. आम्ही सर्वांनी यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत आणि ती उत्कृष्टरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवली. हे बघून आमचा दुसरा सीझन लोकांना याहीपेक्षा अधिक आवडेल, असे दिसते. 

बातम्या आणखी आहेत...