आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टेलिव्हिजन अभिनेता पराग त्यागीच्या वडील आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या सास-यांचे 25 मे रोजी गाझियाबाद येथे निधन झाले आहे. ही बातमी समजताच अभिनेता आपली पत्नी शेफालीसोबत मुंबईहून गाझियाबादला रवाना झआला. त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे समजते. मुंबईहून गाजियाबादला जात असताना शेफालीने मुंबई विमानतळावरील परिस्थिती बघून एक भावूक पोस्ट शेअर केली.
View this post on InstagramA post shared by Shefali Jariwala🌑 (@shefalijariwala) on May 28, 2020 at 1:24am PDT
गाझियाबादला रवाना झालेली शेफाली ब-याच दिवसांनी विमानतळावर आली होती. हा अनुभव तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. विमानतळावर फेस शिल्ड आणि मास्क घातलेली काही छायाचित्रे शेअर करुन तिने लिहिले, "मुंबई विमानतळ, जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक. पूर्वी इतकी शांतता इथे कधीही नव्हती. प्रवासाचा एक दुःखद अनुभव आहे. ना मिठी, ना किस, फक्त भीती. मी देवाला प्रार्थना करतो की, हे सर्व लवकरच सामान्य होईल, परंतु नंतर विचार करते की आता कदाचित हेच सामान्य असेल. आणि आता त्याचा अवलंब करण्याची गरज आहे.'
वडिलांच्या निधनाबद्दल बोलताना परागने इंडिया फोरमला सांगितले की, त्याचे वडील बर्याच दिवसांपासून आजारी होते. डायलिसिससाठी त्यांना नेण्यात येत होते, पण वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ही बातमी समजल्यानंतर पराग आणि शेफाली बुधवारी मुंबईहून गाझियाबादला पोहोचले. फ्लाइट मिळाली नसती तर कारने ते रवाना होणार होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.