आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ आजाराशी झुंजतोय प्रसिद्ध गायक:जस्टिन बीबरच्या अर्ध्या चेहऱ्याला झाला अर्धांगवायू, म्हणाला- मला या बाजूने हसताही येत नाही

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरच बरा होऊन परतेन - जस्टिन बीबर

हॉलिवूडचा प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर चेहऱ्याच्या पॅरालिसिस झाला आहे. स्वतः जस्टिनने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. जस्टिनने सांगितले की, त्याला 'रामसे हंट सिंड्रोम' नावाचा आजार झाला आहे. त्यामुळे त्याच्या चेहऱ्याच्या एका बाजुला पॅरालिसिस झाला आहे.

जस्टिन शेअर केला व्हिडिओ
जस्टिन बीबरने येत्या काळातले काही शोज रद्द केल्याने त्याचे चाहते खूप नाराज झाले. टोरंटो आणि वॉशिंग्टन डीसीमधील शो रद्द केल्यानंतर जस्टिनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने चाहत्यांना त्याचा कॉन्सर्ट शो का रद्द करत आहे, याबद्दल सांगितले आहे. सध्या आपण स्टेजवर फिजिकली परफॉर्म करू शकत नाही. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्यास सांगितले आहे, असा खुलासा जस्टिनने केला आहे.

व्हिडिओत तो म्हणाला, 'ही गोष्ट खूपच गंभीर आहे, तुम्ही बघू शकता. असे व्हायला नको होते, असे मला वाटते; पण माझे शरीर मला थोडे थांबून आराम करायला सांगत आहे. मला आशा आहे, की तुम्ही समजून घ्याल. पुढचा काही वेळ मी विश्रांती आणि आराम करणार आहे, जेणेकरून मी 100 टक्के बरा होऊ शकेन आणि परत येऊन मी ते करीन, ज्यासाठी माझा जन्म झालाय.’

चेह-याला झाला पॅरालिसिस
तो पुढे म्हणाला, 'मला हा आजार एका व्हायरसमुळे झाला आहे. त्याने माझ्या चेहऱ्याच्या नर्व्ह्जवर हल्ला केला आहे. यामुळे माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला पूर्णपणे पॅरालिसिस झाला आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या एका डोळ्याची पापणी लवत नाही. मला या बाजूने हसताही येत नाही आणि या बाजूची माझी नाकपुडीही हलत नाही.’

लवकरच बरा होऊन परतेन
लवकरच बरा होऊन परत येईन, असे जस्टीन म्हणाला आहे. ‘मी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार चेहऱ्याचा व्यायाम करत आहे, जेणेकरून माझा चेहरा पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होऊ शकेल. यासाठी किती वेळ लागेल माहीत नाही; पण माझा देवावर पूर्ण विश्वास आहे,’ असे तो म्हणाला आहे.

वयाच्या 13 व्या वर्षी मिळाली होती प्रसिद्धी
जस्टिनने वयाच्या 13 व्या वर्षी प्रसिद्धी मिळवली होती. वास्तविक त्याच्या आईने त्याचा गातानाचा एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता. आणि त्यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्याने 'बेबी' आणि 'बिलिव्ह'सारखे हिट चार्टबस्टर दिले. जस्टिनने 22 नामांकनांपैकी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. मार्चमध्ये जस्टिनची पत्नी हेली बीबरला मेंदूमध्ये रक्त गोठल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रामसे हंट सिंड्रोम म्हणजे काय?
रामसे हंट सिंड्रोम म्हणजेच RHS हा एक दुर्मिळ न्यूरॉलॉजिकल आजार आहे. यामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर वेदनादायक पुरळ उठते. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर पॅरालिसिस होऊ शकतो. यामुळे बहिरेपणाची गंभीर समस्याही उद्भवू शकते. जेव्हा व्हेरिसेला-झोस्टर विषाणू डोक्याच्या नर्व्ह्जना संसर्ग करतो तेव्हा हा दुर्मिळ आजार होतो.

बातम्या आणखी आहेत...