आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राघव-परिणीतीचा दिल्लीत वाङनिश्चय:परिणीतीने फोटो शेअर केले, राघव यांनी लिहिले- ती हो म्हणाली; आदित्य ठाकरेंसह मान्यवरांची उपस्थिती

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
साखरपुड्यापूर्वी राघव चड्ढा यांचे लेटेस्ट व्हिज्युअल समोर आले आहेत.  ते पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. त्यांच्यासोबत कुटुंबातील काही सदस्यही दिसत आहेत. - Divya Marathi
साखरपुड्यापूर्वी राघव चड्ढा यांचे लेटेस्ट व्हिज्युअल समोर आले आहेत. ते पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. त्यांच्यासोबत कुटुंबातील काही सदस्यही दिसत आहेत.

AAP खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी 13 मे, शनिवारी संध्याकाळी एकमेकांना अंगठी घातली. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांच्या साखरपुड्याची औपचारिक घोषणा केली. त्यांनी लिहिले, 'मी जे मागितले, त्याने हो म्हटले.'

हा संपूर्ण सोहळा दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊसमध्ये पार पडला. संध्याकाळी 5 वाजता समारंभ सुरू झाला, रात्री 9 च्या सुमारास परिणीती आणि राघव यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून अधिकृत माहिती दिली.

या सोहळ्यात राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग घेतला. या सोहळ्यात प्रियांका चोप्रा प्रथम पोहोचली होती. यानंतर परिणीतीचे कुटुंबीय येऊ लागले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही या सोहळ्यात सहभागी झाले होते. याशिवाय देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेस नेते कपिल सिब्बल, शिवनेता नेते आदित्य ठाकरे आणि टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन हेही पक्षात पोहोचले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीतीने तिच्या एंगेजमेंटमध्ये पेस्टल कलरचा सूट घातला होता. हे फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केले आहे. परिणीतीला कंप्लीमेंट देताना राघवने पेस्टल कलरचा अचकन परिधान केला होता.​​​​

साखरपुड्यानंतर दोघांनी सोशल मीडियावरून फोटो शेअर केले.
साखरपुड्यानंतर दोघांनी सोशल मीडियावरून फोटो शेअर केले.
दोघांनी एकमेकांना अंगठी घातली.
दोघांनी एकमेकांना अंगठी घातली.
साखरपुड्यानंतर दोघांनी सोशल मीडियावरून फोटो शेअर केले.
साखरपुड्यानंतर दोघांनी सोशल मीडियावरून फोटो शेअर केले.
साखरपुड्यानंतर दोघांनी सोशल मीडियावरून फोटो शेअर केले.
साखरपुड्यानंतर दोघांनी सोशल मीडियावरून फोटो शेअर केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोहळ्याला उपस्थिती लावली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोहळ्याला उपस्थिती लावली.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही सोहळ्याला आले.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही सोहळ्याला आले.
काँग्रेस नेते पी चिंदबरमही साखरपुड्यासाठी आले होते.
काँग्रेस नेते पी चिंदबरमही साखरपुड्यासाठी आले होते.
शिवसेना नेते आदित्या ठाकरेंनीही उपस्थिती लावली.
शिवसेना नेते आदित्या ठाकरेंनीही उपस्थिती लावली.
प्रियंका चोप्रा सोहळ्यात सर्वात आधी दाखल झाली.
प्रियंका चोप्रा सोहळ्यात सर्वात आधी दाखल झाली.
आज सकाळी प्रियांका लंडनहून दिल्लीत दाखल झाली.
आज सकाळी प्रियांका लंडनहून दिल्लीत दाखल झाली.
डिझायनर मनीष मल्होत्राही राघव चढ्ढा यांच्या घरी पोहोचले.
डिझायनर मनीष मल्होत्राही राघव चढ्ढा यांच्या घरी पोहोचले.

तत्पूर्वी परिणीतीच्या मुंबईत येथील घरीदेखील रोषणाई करण्यात आली. आता साखरपुड्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची यादी समोर आली आहे.

परिणीतीच्या घरावर रोषणाई करण्यात आली आहे.
परिणीतीच्या घरावर रोषणाई करण्यात आली आहे.

'हे' सेलिब्रिटी पोहोचणार साखरपुड्याला
आज संध्याकाळी 5 वाजता साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. परिणीती आणि राघव दोघेही पंजाबी असल्याने पंजाबी पद्धतीने हा कार्यक्रम होईल. सर्वप्रथम सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. यानंतर प्रार्थना होईल आणि नंतर दोघे एकमेकांना अंगठी घालतील. या साखरपुड्याला परिणीती आणि राघव यांनी बॉलिवूड आणि राजकारणातील मंडळींना आमंत्रित केले आहे. जवळजवळ 150 पाहुणे या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडमधून करण जोहर, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, सानिया मिर्जा, अर्जुन कपूर, मलाइका अरोरा, फराह खान यांचा समावेश पाहुण्यांमध्ये आहे. तर राघव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही साखरपुड्यासाठी आमंत्रित केले आहे.

पाहुण्यांसाठी शाही भोजनाची व्यवस्था
परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यात येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास मेजवानी असणार आहे. वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असणार आहे. परिणीतीला कबाब आवडत असल्याने मेन्यूमध्ये कबाबचादेखील समावेश करण्यात आला आहे. तसेच या साखरपुड्यात शाकाहारी मंडळींसाठी शाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक गोड पदार्थदेखील असणार आहेत.

परिणीतीसाठी मनीष मल्होत्रांनी डिझाइन केला आउटफिट
या कार्यक्रमाला प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राही उपस्थित राहणार आहेत. त्यांनीच परिणीतीचा साखरपुड्याचा आउटफिट डिझाइन केला आहे. तर राघव यांचा आउटफिट फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केला आहे. परिणीती आणि राघव यांच्या शाही साखरपुड्याची थीम हटके आहे. त्यांच्या साखरपुड्याला येणाऱ्या मंडळींसाठी पेस्टल रंगाची थीम ठेवण्यात आली आहे.

दरम्यान राघव यांचे दिल्लीतील सरकारी निवासस्थानही दिव्यांनी आणि फुलांनी सजवण्यात आले आहे. साहजिकच त्या दोघांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा दिवस आहे.

राघव यांचे दिल्लीतील अधिकृत निवासस्थान.
राघव यांचे दिल्लीतील अधिकृत निवासस्थान.

परिणीतीचे चित्रपट
परिणीतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्यासोबत 'उंचाई'मध्ये झळकली होती. आता ती इम्तियाज अली यांच्या 'चमकिला'मध्ये दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे.

कोण आहेत राघव चड्ढा?
आजच्या काळात देशात काही मोजकेच तरुण राजकारणी स्वतःच्या बळावर राजकारणात उतरले आहेत. राघव चड्डा हे अशाच हरहुन्नरी तरुणांपैकी एक मानले जातात. राघव यांनी मेहनती आणि परिश्रमाच्या जोरावर नाव कमावत तरुण वयातच करिअरच्या उंचीवर पोहोचले आहेत. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून त्यांनी एक विशेष ओळख निर्माण केली आहे. राघव दिल्लीतील केजरीवाल सरकार म्हणजेच आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. 2020 मध्ये राजेंद्र दिल्ली नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर वयाच्या 31 व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. तसेच ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि सध्या जल बोर्डाचे उपाध्यक्ष आहेत. पंजाबच्या निवडणुकीत राघव चड्डा यांनी आपल्या जबरदस्त नेतृत्व कौशल्याच्या जोरावर आम आदमी पार्टीला प्रचंड मतांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मुहूर्त:राघव चढ्ढा-परिणिती चोप्राची आज एंगेजमेंट; दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये घालणार रिंग; पार्टीसाठी निवडली बॉलिवूड थीम

आम आदमी पार्टीचे नेते-खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आज म्हणजेच शनिवारी दिल्लीत एंगेजमेंट करणार आहेत. हा कार्यक्रम कपूरथला हाऊस, दिल्ली येथे होणार आहे. वाचा सविस्तर...