आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅक्शन थ्रिलर:परिणीती चोप्रा-हार्डी संधूचा‘कोड नेम-तिरंगा’ 14 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिणीती चोप्रा आणि प्रसिद्ध पंजाबी गायक हार्डी संधू स्टारर चित्रपट कोड नेम तिरंगा १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्माते रिभू दासगुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

रिभू दासगुप्ता यांनी कॅप्शनमध्ये लिहिले... माझ्या पुढच्या चित्रपटाचे कोड नेम - तिरंगा’ जाहीर करताना आनंद होत आहे. हा चित्रपट १४ ऑक्टोबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. मला आशा आहे की, देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकाच्या बलिदानावर आधारित हा अ‍ॅक्शन एंटरटेनर प्रेक्षकांना आवडेल. हा चित्रपट त्याच्या राष्ट्रासाठी स्थिर आणि निर्भय मिशनवर आधारित आहे.'

या चित्रपटात परिणीती रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच शरद केळकर, रजित कपूर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती आणि दिशा मारीवाला यांसारखे दिग्गज कलाकारही दिसणार आहेत. याची निर्मिती भूषण कुमार, रिलायन्स एंटरटेनमेंट, फिल्म हँगर आणि विवेक बी अग्रवाल यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...