आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुड्याची जय्यत तयारी:परिणीती चोप्राचे घर सजले, रोषणाई केल्याचा व्हिडिओ समोर; 13 मे रोजी भारतात पोहोचणार प्रियांका

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांचा येत्या 13 मे रोजी साखरपुडा असल्याची चर्चा आहे. या चर्चादरम्यान आता परिणीती चोप्राच्या मुंबईतील घराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तिच्या घराबाहेर रोषणाई केल्याचे पाहायला मिळत आहे. परिणीती राहत असलेल्या संपूर्ण घराला बाहेरुन रोषणाई केल्याचे दिसत आहे. यावरुन अनेकांनी तिच्या साखरपुड्याची तयारी सुरु झाल्याचे म्हटले आहे.

मुंबईत नव्हे दिल्लीत साखरपुड्याचा कार्यक्रम

राघव आणि परिणीती यांचा साखरपुडा मुंबईत नसून दिल्लीत होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच राघव आणि परिणीती दिल्लीला पोहोचले. त्यांचे मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील व्हिडिओदेखील समोर आले होते.

कपूरथला हाऊसमध्ये होणार साखरपुडा, प्रियांका 13 तारखेला सकाळी मुंबईत येणार
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, परिणीती-राघव यांचा साखरपुडा दिल्लीतील कनॉट प्लेसच्या कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका बहिणीच्या एंगेजमेंटसाठी 13 मे रोजी सकाळी दिल्लीला पोहोचेल.

प्रियांका कामातून वेळ काढून भारतात येणार आहे
सूत्राने सांगितले की, 'प्रियांकाचा हा भारत दौरा खूपच छोटा असणार आहे. तिच्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकातून वेळ काढून ती या कार्यक्रमाचा भाग होणार आहे. त्यामुळेच ती या कार्यक्रमाला आधी येऊ शकली नाही. तिचा नवरा निक या समारंभाला उपस्थित राहू शकणार नाही."

परिणीती मनीष मल्होत्राचा डिझायनर लेहेंगा घालणार
परिणीतीने तिच्या या खास दिवसासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रांकडून लहेंगा डिझाइन करुन घेतला आहे. तर राघव त्यांचे मामा आणि फॅशन डिझायनर पवन सचदेव यांच्या डिझायनर ड्रेसमध्ये दिसणार आहे.

साखरपुड्यासाठी 150 लोकांना आमंत्रण
परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी 150 लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असणार आहे. त्यांच्या साखरपुडा समारंभात सकाळी सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या हातात अंगठी घालत साखरपुडा करतील.

लग्नाला बोलावणार का? - पापाराझींनी विचारला होता प्रश्न
दरम्यान, मंगळवारी दिल्ली एअरपोर्टवर परिणीती आणि राघव यांना पापाराझींनी घेरले होते. या दोघांना पाहिल्यावर पापाराझींनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. अनेकांनी "लग्नाला आम्हाला बोलवणार का?" असा प्रश्न दोघांना विचारला. यावर परिणीतीने दरवेळीप्रमाणे ‘थँक यू’ म्हणत एअरपोर्टवरुन काढता पाय घेतला. तसेच काही फोटोग्राफर्सनी "वहिनी-वहिनी" म्हणत अभिनंदन केल्यावर राघव चड्ढा हसत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

लंच डेटवर एकत्र दिसल्यानंतर डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राघव आणि परिणीती गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या नात्याला समंती दर्शवली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत लंच डेटवर एकत्र दिसल्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते

ऑक्टोबरमध्ये लग्नागाठीत अडकू शकतात दोघे
रिपोर्ट्सनुसार, लग्नाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस दोघे लग्नाच्या बंधनात अडकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.