आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा सध्या त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसत आहेत. दरम्यान नुकतेच दोघे पुन्हा एकदा मुंबई विमानतळाबाहेर स्पॉट झाले, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 13 मे रोजी म्हणजेच शनिवारी परिणीती आणि राघव यांचा दिल्लीत साखरपुडा होणार आहे. याचसाठी दोघेही दिल्लीला रवाना झाले आहेत.
पाहा दिल्लीत पोहोचल्यानंतरचा परिणीती आणि राघव यांचा व्हिडिओ -
रेड आउटफिटमध्ये दिसली परिणीती
परिणीती चोप्रा विमानतळावर अतिशय साध्या लूकमध्ये दिसली. तिने रेड कलरचा कुर्ता-प्लाझो घातला होता. ब्लॅक गॉगल लावून तिने आपला हा लूक पूर्ण केला. तर दुसरीकडे राघव ब्लॅक शर्ट ऑफ व्हाइट ट्राउझरमध्ये दिसले.
गेल्याच महिन्यात होणार होता साखरपुडा
खरं तर गेल्याच महिन्यात 10 एप्रिल रोजी दोघे साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. पण गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीच्या आरोपपत्रात राघव यांचे नाव आल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, आरोपपत्रात राघव यांचे नाव आरोपी म्हणून नाहीये. ईडीने त्याला केवळ चौकशीसाठी बोलावले होते. आता 13 मे रोजी दिल्लीत दोघे ऑफिशिअली एंगेज्ड होणार असल्याचे म्हटले जात आहे.
लंच डेटवर एकत्र दिसल्यानंतर डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राघव आणि परिणीती गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या नात्याला समंती दर्शवली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत लंच डेटवर एकत्र दिसल्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते
काही दिवसांपूर्वीच राघव-परिणिती आयपीएल 2023 चा सामना पाहण्यासाठी मोहाली स्टेडियमवर एकत्र पोहोचले होते. यावेळी दोघांची खास बाँडिंग पाहायला मिळाली. यावेळी परिणीतीला स्टेडियममध्ये पाहून चाहत्यांनी 'परिणीती वहिनी झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.
ऑक्टोबरमध्ये लग्नागाठीत अडकू शकतात दोघे
रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघवच्या साखरपुड्याला जवळपास 150 जवळचे मित्र आणि कुटुंबीयांना आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस दोघे लग्नाच्या बंधनात अडकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एकत्र दिसले:राघव चड्ढासोबत IPL मॅच बघायला पोहोचली परिणीती चोप्रा, अख्ख्या स्टेडियममध्ये एकच घोषणा 'परिणीती वहिनी झिंदाबाद'
एकीकडे अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा रिलेशनशिपमध्ये असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चादरम्यान दोघेही बुधवारी मोहालीत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगलेला सामना पाहण्यासाठी एकत्र पोहोचले होते. सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दोघेही मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत. वाचा सविस्तर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.