आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलेब लाइफ:स्वतःचे जुने फोटो बघून घाबरते परिणीती चोप्रा, म्हणाली - मी कॉलेजच्या दिवसांत खूपच लठ्ठ होते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परिणीती म्हणते - आजही मी माझे जुने फोटो बघून घाबरते.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा 'द गर्ल ऑन द ट्रेन' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात परिणीतीने मीरा कपूर नावाच्या अशा मुलीची भूमिका साकारली आहे, जी एम्नेसिया नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे, ती तिच्या आयुष्यातील काही वर्षांच्या दरम्यान घडलेल्या घटना विसरते आणि हत्येच्या आरोपात अडकते.

अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने परिणीतीने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारला गेला. खासगी आयुष्यात अशी एखादी वाईट घटना जी तुला कायमची पुसुन काढायची असेल तर ती कोणती असेल?, असा प्रश्न परिणीतीला विचारला गेला.

या प्रश्नाचे उत्तर देताना परिणीती म्हणाली, "जेव्हा मी खूप लठ्ठ होते, त्या सर्व आठवणी मला पूसून काढायची इच्छा आहे. मी कॉलेजमध्ये असतानाचा तो काळ होता. त्याकाळात लठ्ठपणामुळे मी खूपच वाईट दिसायचे. आता मी पुर्वीसारखी राहिले नाही. आज मी आरोग्याबद्दल आणि आयुष्याबद्दल पूर्वीपेक्षा अधिक जागरूक आहे, म्हणूनच पुर्वीचा तो काळ मला माझ्या आयुष्यातून काढून टाकायचा आहे. आजही मी माझे जुने फोटो बघून घाबरते.'

मेथड अॅक्टिंग करणार परिणीती

यापूर्वी एका मुलाखतीत परिणीतीने 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती की, 'या चित्रपटात मी मेथड अ‍ॅक्टिंग करणार आहे. मी आजपर्यंत कधीही न साकारलेली मद्यधुंद तरुणीची भूमिका यात साकारणार आहे. मी ख-या आयुष्यात मद्यपान करत नाही.' या चित्रपटात परिणितीने जी भूमिका साकारली आहे ती 'द गर्ल ऑन द ट्रेन 'या मूळ चित्रपटात एमिली ब्लंटने साकारली होती.

अशी आहे चित्रपटाची कहाणी

ही कथा लंडनमध्ये राहणा-या घटस्फोटित महिलेची आहे. ती दररोज ट्रेनमधून आपल्या ऑफिस ते नवीन घरापर्यंतचा प्रवास करते. योगायोगाने, ट्रेन तिच्या जुन्या घरापासून जाते जिथे तिचा पुर्वाश्रमीचा पती त्याची नवीन पत्नी आणि मुलासह राहतो. एके दिवशी प्रवास करत असताना, तिला असे काहीतरी दिसते ज्यामुळे तिला धक्का बसतो. याच घटनेवर चित्रपटाचे कथानक बेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...