आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा रिलेशनशिपमध्ये असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चादरम्यान दोघेही बुधवारी मोहालीत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगलेला सामना पाहण्यासाठी एकत्र पोहोचले होते. सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दोघेही मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत.
साखरपुड्याच्या चर्चादरम्यान दोघांचा पहिला पब्लिक अपिअरन्स
समोर आलेल्या व्हिडिओत परिणीती आणि राघव आपल्या चाहत्यांना नमस्कार करताना आणि हात हलवून अभिवादन करताना दिसत आहेत. यावेळी परिणीती ब्लॅक ड्रेसमध्ये तर राघवदेखील ब्लॅक कलरच्या शर्टमध्ये दिसले. गंमत म्हणजे मोहालीच्या स्टेडियममध्ये परिणीती चोप्राला पाहून चाहत्यांनी असे काही केले ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. परिणीतीला स्टेडियममध्ये पाहून चाहत्यांनी 'परिणीती वहिनी झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या आणि हे सर्व पाहून परिणीती चकीत झाली.
13 मे रोजी दिल्लीत राघव आणि परिणीतीचा साखरपुडा
साखरपुड्याच्या चर्चादरम्यान दोघांचा हा पहिला पब्लिक अपिअरन्स होता. येत्या 13 मे रोजी दोघांचा दिल्लीत साखरपुडा असल्याची जोरदार चर्चा आहे. पण अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. खरं तर गेल्याच महिन्यात 10 एप्रिल रोजी दोघे साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. पण गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीच्या आरोपपत्रात राघव यांचे नाव आल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, आरोपपत्रात राघव यांचे नाव आरोपी म्हणून नाहीये. ईडीने त्याला केवळ चौकशीसाठी बोलावले होते. आता 13 मे रोजी दिल्लीत दोघे ऑफिशिअली एंगेज्ड होणार असल्याचे म्हटले जात आहे.
लंच डेटवर एकत्र दिसल्यानंतर डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राघव आणि परिणीती गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या नात्याला समंती दर्शवली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत लंच डेटवर एकत्र दिसल्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते.
या सेलिब्रिटींनी केली परिणीती-राघवच्या नात्याची पुष्टी
परिणीती आणि राघव अद्याप त्यांच्या नात्याविषयी मौन बाळगून आहेत. पण त्यांच्याशी संबंधित अनेकांनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला आहे. अलीकडेच गायक आणि अभिनेता हार्डी संधू याने दोघांच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला. तो म्हणाला की, "मी परिणीतीसाठी खूप आनंदी आहे, मी तिला शुभेच्छा देतो. मी तिचे फोनवर अभिनंदनही केले आहे."
हार्डी संधू आणि परिणीती यांनी 'कोड नेम : तिरंगा' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. तो म्हणाला, "कोड नेम तिरंगा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान परिणीती आणि माझ्यात लग्नाबद्दल चर्चा झाली होती. तेव्हा ती नेहमी म्हणायची की, जेव्हा मला वाटेल की मला योग्य व्यक्ती सापडली आहे तेव्हाच मी लग्न करेल."
'आप'च्या खासदाराने ट्वीट शेअर करुन दिल्या दोघांना शुभेच्छा
आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोरा यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, 'मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आनंदी राहा. तुम्हाला शुभेच्छा.' या ट्वीटमध्ये संजीव अरोरा यांनी परिणीती आणि राघव यांचा फोटो देखील शेअर केला आहे. संजीव अरोरा यांच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले.
पंजाबमध्ये पहिल्यांदा भेटले दोघे
ई टाझम्सच्या वृत्तानुसार, परिणीती आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये पहिल्यांदा भेटले होते. हे दोघे किती दिवसांपासून नात्यात आहेत, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. परंतु असे म्हटले जाते की, दोघेही जवळपास मागील सहा महिन्यांपासून एकत्र आहेत. राघव हे पंजाबमधील भगवंत मान सरकारचे मुख्य सल्लागार आहेत.
यापूर्वी परिणीतीचे नाव दिग्दर्शक मनीष शर्मासोबत जोडले गेले
राघव चढ्ढा यांच्यापूर्वी परिणीतीचे नाव दिग्दर्शक मनीष शर्मासोबत जोडले गेले होते. मनीष हा शाहरुख खानचा 'फॅन', परिणीतीचा पहिला चित्रपट 'लेडीज वर्सेस रिकी बहल' आणि 'शुद्ध देसी रोमान्स' यांसारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखला जातो. रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि मनीषला वेगळे होऊन एक वर्ष झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.