आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Parmeet Sethi Turne 60: Parmeet Sethi's Parents Were Against Him Getting Married To Bold Actress Archana Puran Singh, Kept The Marriage Hidden From The World For 4 Years After The Secret Wedding

60 वर्षांचे झाले परमीत सेठी:बोल्ड अभिनेत्री अर्चना पूरन सिंगसोबत लग्नाच्या विरोधात होते परमीत सेठीचे आई -वडील, 4 वर्षे जगापासून लपवून ठेवले होते लग्न

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्यरात्री लग्नासाठी मंदिरात पोहोचले होते परमीत-अर्चना

शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करणारे अभिनेते परमीत सेठी यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. हँडसम लूक असलेल्या परमीत यांनी अनेक चित्रपटांमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारत लोकप्रिया मिळवली. परमीत यांनी लोकप्रिय अभिनेत्री अर्चना पूरन सिंगसोबत लग्न केले असून त्यांच्या लग्नाता आता 29 वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. परंतु सहजासहजी या दोघांचे लग्न झाले नाही. यांच्या लव्ह स्टोरीत अनेक अडचणी आल्या. आज परमीत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या लव्ह स्टोरीविषयी...

इव्हेंटमध्ये झाली होती पहिली भेट
अर्चना पूरन सिंग आणि परमीत यांची पहिली भेट एका कार्यक्रमात झाली होती. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांवर इम्प्रेस झाले होते. मैत्री झाल्यानंतर आयुष्यभर एकत्र राहू शकतो, याची जाणीव परमीत यांना झाली. अर्चना यांचे परमीत यांच्याशी दुसरे लग्न आहे. त्यांचा पहिला संसार फार काळ टिकला नाही. पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर अर्चना यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. अर्चना यांचे पहिले लग्न तुटल्यानंतर त्यांचा प्रेमावर विश्वास नव्हता. पण परमीत यांनी त्यांना पुन्हा प्रेम करायला शिकवले.

लिव्ह इनमध्ये राहिले होते परमीत-अर्चना
काही काळ डेटिंग केल्यानंतर अर्चना आणि परमीत यांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जेव्हा परमीत यांनी त्यांच्या आईवडिलांना अर्चनासोबत लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले, तेव्हा आईवडिलांनी त्यांच्या नात्याला नकार दिला होता. अर्चनाने सांगितल्यानुसार, अभिनेत्री असल्याने परमीतच्या आई-वडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. काहीही झाले तरी अर्चनाशीच लग्न करण्यावर परमीत ठाम होते.

मध्यरात्री लग्नासाठी मंदिरात पोहोचले होते परमीत-अर्चना
आईवडिलांच्या विरोधात जाऊन अर्चनाशी गुपचूप लग्न करण्याचा निर्णय परमीत यांनी घेतला होता. अर्चना आणि परमीत यांनी कोणालाही न सांगता गुपचूप लग्न केले. र्चना आणि परमीत यांनी रात्री 11
वाजता लग्न करायचे ठरवले होते. त्यानंतर सर्व तयारी करण्यात आली होती. पण जेव्हा लग्नाचे विधी करण्यासाठी भटजींना बोलवण्यात आले तेव्हा त्यांनी असे लग्न होऊ शकत नाही असे सांगितले. लग्नासाठी मुहूर्त काढावा लागतो असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी भटजींनी सांगितल्या प्रमाणे अर्चना यांनी मुहूर्त काढून लग्न केले.

चार वर्षे जगापासून लपवून ठेवले होते लग्न
लग्नानंतरही चार वर्षांपर्यंत त्यांनी कोणालाच काहीच सांगितले नव्हते. विशेष म्हणजे लग्नाच्याच दिवशी अर्चना ही सैफ अली खानच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती. शूटिंगमधून
वेळ काढून तिने परमीतशी लग्न केले आणि त्याची कोणालाच कानोकान खबर लागू दिली नव्हती. त्यावेळी सोशल मीडिया नसल्याने लग्न केल्याचे लपवणे सोपे गेल्याचे अर्चनाने द कपिल शर्मा शोमध्ये सांगितले होते. अर्चना आणि परमीत 30 जून 1992 रोजी लग्नगाठीत अडकले होते. त्यांना आयुष्मान आणि आर्यमान ही दोन मुले आहेत.

बातम्या आणखी आहेत...