आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेडिंग बेल्स:'कुछ-कुछ होता है'मधील क्यूट सरदार 4 महिन्यांनंतर अडकणार आहे लग्नबंधनात, डेलना श्रॉफ आहे परजानची भावी पत्नी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता परजानचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे.

शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील क्यूट सरदार अर्थातच अभिनेता परजान दस्तूर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. परजानने वर्षभरापूर्वी डेलना श्रॉफसोबत साखरपुडा केला होता. तेव्हाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन परजानने सांगितले की, दोघे फेब्रुवारी 2021 मध्ये लग्न करणार आहेत.

परजानने डेलनासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करुन लिहिले - ''एक वर्षापूर्वी असाच सुंदर दिवस होता, जेव्हा ती हो म्हणाली होती. आता फक्त 4 महिने बाकी आहेत.''

परजानची स्वतःची आहे निर्मिती कंपनी
परजानने मोहब्बतें, कहो ना प्यार है, हाथ का अंडा, ब्रेक के बाद, है दिल बार बार, हम तुम परजानिया, पॉकेट मम्मी, कभी खुशी कभी गम या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तो 2009 मध्ये पियुष
झांच्या 'सिकंदर'मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. आता परजानचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. परजान दस्तूरने ‘हम तूम’ या चित्रपटाला आपला आवाज दिला होता.