आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद:'पाताल लोक'ची निर्माती आणि अभिनेत्री अनुष्का शर्माविरोधात रासुकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी, आमदाराने केली तक्रार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेबसीरीजमधून सनातन धर्माची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचा आमदाराचा आरोप

अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज झालेली पाताललोक वेब सीरिज आजकाल वादात असून या वेब सीरिजच्या अडचणी वाढत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मावर 'पाताल लोक' वेबसीरीजमधून सनातन धर्माची चुकीची प्रतिमा दाखवण्याचा आरोप करण्यात आला. उत्तरप्रदेशातील लोनीचे भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी पोलिसांत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली असून रासुआ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. नंदकिशोर गुर्जर यांनी वेब सीरिजमध्ये वापरलेले फोटो, सनातन धर्माची चुकीची प्रतिमा दाखवणे आणि भारतीय संस्थांचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला आहे.

भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी 'पाताललोक' वेबसीरीजमध्ये त्यांचे आणि अन्य भाजप नेत्यांचे फोटो गुन्हेगारीच्या प्रतिमा असणाऱ्या नेत्यांशी जोडत वापरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सीरीजच्या माध्यमातून सनातन धर्मातील जाती व भारतीय संस्थांचे चुकीच्या चित्रिकरणाला देशद्रोह सांगत आमदाराने लोणी कोतवाली येथे निर्माती अनुष्का शर्मावर रासुकअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी तक्रारीत म्हटले की, "वेबसीरीजची निर्माती अनुष्का शर्माने वेब सीरीजमध्ये बालकृष्ण वाजपेयी नावाच्या गुन्हेगारीशी संबंधित नेत्यासोबत पुलाचे उद्घाटन करताना माझा आणि अन्य भाजपच्या नेत्यांचा फोटो दाखवला आहे. मी सध्या भाजपचा आमदार असून परवानगी शिवाय माझ्या फोटोचा वापर करण्यात आला. याशिवाय वेबसीरीजमध्ये गुर्जर जाती डाकू आणि चुकीच्या कामात सहभागी असल्याचे दाखवले आहे. पंजाबचे जाट (जट), ब्राह्मण, त्यागी इत्यादी जातींमध्ये भेदभाव आणि जातीवाचक शब्दांचा वापर करत त्यांचे जीवन खालच्या पातळीवर असल्याचे दाखवले आहे. जो धर्म मुंग्यांना पीठ टाकतो आणि विश्व कल्याणासाठी प्रार्थना करतो त्या धर्माची प्रतिमा विनाकारण मॉबलिचिंगच्या घटनेला 1990 रामजन्मभूमीच्या कारसेवकांसोबत जोडून प्रदर्शित करण्यात आली. या सीरीजमध्ये भाजपची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे."

बातम्या आणखी आहेत...