आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद, बॉयकॉट आणि बंपर अ‍ॅडव्हान्स बूकिंग:आज रिलीज होईल पठाण, चाहत्याने अख्खे थिएटर बूक केले, बंद 25 स्क्रिन्सही सुरू होणार

लेखक: अरुणिमा शुक्ला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरूख खानचा चित्रपट पठाण आज मोठ्या पडद्यावर रिलीज होत आहे. चित्रपटाच्या पहिल्या टीझरपासून सुरू झालेला बॉयकॉट ट्रेंड, नंतर बेशरम रंग गाण्यात दीपिकाच्या भगव्या बिकिनी वादाने चित्रपटाची खूप चर्चा झाली. पहिल्यांदाच असे झाले की शाहरूख खान आणि दीपिकाने आपल्या चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनमध्ये भाग घेतला नाही. दोन्ही कलाकारांनी मीडियाला मुलाखतही दिली नाही, तसेच कोणत्याही टीव्ही चॅनलच्या शोमध्ये ते पठाणचे प्रमोशन करताना दिसले.

सर्व वाद आणि बॉयकॉटदरम्यान 20 जानेवारीपासून पठाणची अॅडव्हान्स बूकिंग सुरू झाली. याला चांगलाच प्रतिसाद बघायला मिळाला. पहिल्याच दिवशी 1.71 लाख तिकिटे बूक झाली. 23 जानेवारीच्या सायंकाळपर्यंत हा आकडा 3.5 लाखांच्या आसपास पोहोचला. अॅडव्हान्स बूकिंगच्या बाबतीत पठाण हा सर्वात मोठा हिंदी चित्रपट बनला आहे. याच्या पुढे केवळ केजीएफ-2 आहे, ज्याची 5 लाखांहून जास्त अॅडव्हान्स तिकिटे बूक झाली होती.

मुंबईत चाहत्याने पूर्ण थिएटर बूक केले

मुंबईत शाहरूखच्या एका चाहत्याने 25 जानेवारीच्या पहिल्या शोसाठी पूर्ण थिएटर बूक केले. याची सर्व तिकिटे अॅसिड सर्व्हायव्हर मुली आणि शाहरूखच्या चाहत्यांना वाटली जातील. यादरम्यान ट्रेड अॅनालिस्ट तरूण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक मोठी अपडेटही दिली की, पठाणच्या रिलीजसह देशातील 25 सिंगल स्क्रिन थिएटर पुन्हा सुरू होत आहेत, जे कोरोनादरम्यान बंद झाले होते.

चित्रपट हिट होईल किंवा फ्लॉप हे येत्या 4-5 दिवसांत स्पष्ट होईल. मात्र ज्या पद्धतीने पठाणची अॅडव्हान्स बूकिंग झाली आहे, त्याने हे स्पष्ट झाले आहे की दीर्घ कालावधीनंतर एखाद्या बॉलीवूड चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे. ट्रेड अॅनालिस्टसचा अंदाज आहे की पठाणची पहिल्या दिवसाची कमाई 45 कोटींच्या आसपास असू शकते. पहिल्या 2-3 दिवसांतच चित्रपट 100 कोटींच्या कमाईचा आकडा पार करेल.

आधी एक नजर 4 दिवसांच्या अॅडव्हानस बूकिंगवर

4 वर्षांनंतर शाहरूख खान हिरो म्हणून मोठ्या पडद्यावर वापसी करत आहे. यानिमित्ताने वाचा, बेशरम रंग गाण्याच्या वादापासून ते शाहरूख-दीपिकाच्या गेल्या 10 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत कोणकोणते चढ-उतार आले.

एसआरके फॅनने अॅसिड व्हिक्टिम्ससाठी बूक केले थिएटर

पठाण चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालिचा उत्साह बघायला मिळत आहे. अलिकडेच बातम्या आल्या आहेत की मुंबईत राहणाऱ्या अमीर मर्चंट यांनी पठाणच्या रिलीजच्या दिवशी अॅसिड हल्ला पीडितांसाठी पूर्ण थिएटर बूक केले आहे. अॅसिड हल्ला पीडितांशिवाय काही सीट शाहरूखच्या चाहत्यांसाठीही आहे. असे प्रथमच होईल, जेव्हा गॅलेक्सी थिएटरमध्ये सकाळी 9 चा शो असेल.

पठाण पाहू शकलो नाही तर आत्महत्या करेल - एसआरके फॅन

एसआरकेच्या एका फॅनने तर सोशल मीडियावर रडतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तो म्हणत होता की तो शाहरूख खानचा मोठा फॅन आहे. तो त्याच्यावर खूप प्रेम करतो. त्याच्याकडे पठाणचे तिकिट घेण्यासाठी पैसे नाही. आत्महत्येची धमकी देत तो म्हणाला की, जर त्याला चित्रपट पाहण्यासाठी तिकिट मिळाले नाही तर तो तलावात उडी घेईल.

चाहत्यांनी 35 शहरांत लावले 15 हजार पोस्टर

शाहरूखच्या एका फॅन क्लबने पठाणच्या प्रसिद्धीसाठी देशातील 35 शहरांत सुमारे 10 ते 15 हजार पोस्टर लावले आहेत. या फॅन क्लबचे संस्थापक जावेद शेख यांचे म्हणे आहे की, पठाणची रिलीज ग्रँड बनवण्यासाठी ते कोणतीही कसर सोडणार नाही.

त्यांचे म्हणणे आहे की ते देशाच्या अनेक भागांत पोस्टर मोहीम राबवत आहेत. याशिवाय लाऊडस्पीकरद्वारेही ते पठाणचे प्रमोशन करतील.

आता एक नजर गेल्या 4 दिवसांच्या अॅडव्हान्स बूकिंगवर

हा डेटा भारतातील तीन नॅशनल चेनमध्ये विकलेल्या तिकिटांचा आहे.
हा डेटा भारतातील तीन नॅशनल चेनमध्ये विकलेल्या तिकिटांचा आहे.

शाहरूखच्या प्रमोशनचा वेगळा अंदाज

शाहरूख पठाणचे वेगळ्या अंदाजात प्रमोशन करत आहे. यावेळी प्रमोशनसाठी तो कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये गेला नाही, तसेच माध्यमांना मुलाखतही दिली नाही.

शाहरूख या वेळी #AskSrk हे सेशन ट्विटर हँडलवर होस्ट करतो. त्याद्वारे चाहत्यांशी बोलत आहे आणि चित्रपट प्रमोट करत आहे. त्याने द कपिल शर्मा शोच्या टीमलाही नकार दिला आणि बिग बॉस 16 मध्येही जाण्याची शक्यता नाही.

कोव्हिडनंतर केजीएफ 2, ब्रह्मास्त्र आणि पठाणची नॅशनल चेन्समध्ये चांगलीच अॅडव्हान्स बूकिंग झाली आहे.

सुमारे 10000 स्क्रिन्सवर रिलीज होईल पठाण

25 जानेवारी रोजी पठाण पॅन इंडिया रिलीज होत आहे. हिंदी बेल्टमध्ये तो सुमारे 45000 स्क्रिन्सवर रिलीज होईल, तर तमिळ आणि तेलुगूतील स्क्रिन्स मिळून तो सुमारे 5000 स्क्रिन्सवर रिलीज होईल.

गोड्या पाण्याच्या सर्वात मोठ्या सरोवरात झाले पठाणचे चित्रीकरण

पठाणच्या काही सीन्सचे चित्रीकरण बायकल सरोवरावर झाले आहे. इथे चित्रीकरण होणारा हा पहिलाच चित्रपट आहे.

या सरोवराचे वैशिष्ट्य असे आहे की जगातील एकूण गोड्या पाण्यापैकी 20 टक्के भाग या सरोवरात आहे. या सरोवराची लांबी 636 किमी आणि खोली सुमारे 1637 किमी आहे. ते दक्षिण सायबेरियात आहे.

पठाणची अॅडव्हान्स बूकिंग पाहून हा अंदाज लावला जात आहे की कमाईच्या बाबतीत तो केजीएफ-2 ला मागे टाकेल.

पठाणने सिंगल स्क्रिन्स पुन्हा जिवंत केल्या

पठाणसाठी बंपर अॅडव्हान्स बूकिंग होत आहे. अॅडव्हान्स बूकिंगचा प्रतिसाद बघता देशातील बंद झालेले 25 सिंगल स्क्रिन थिएटर पुन्हा सुरू केले जात आहेत.

पठाणचा वादांचा प्रवास

दीपिकाने भगवी बिकिनी घातल्याने सुरू झाला वाद

बेशरम रंग गाणे 12 डिसेंबरला रिलीज करण्यात आले होते. गाण्यात दीपिका पदुकोण भगव्या रंगाच्या बिकिनीत दिसली होती. यानंतर या गाण्याविषयी वाद सुरू झाला. काही सोशल मीडिया युझर्स म्हणत आहेत की भगवा रंग हिंदू धर्माचे प्रतिक आहे आणि दीपिका या रंगाचे कपडे घालून 'बेशरम रंग' बोल असलेल्या गाण्यावर नृत्य करत आहे की हे आपत्तीजनक आहे. बॉयकॉट करणाऱ्यांचे म्हणणे आहे की पवित्र भगव्या रंगाचा वापर बिकिनीसाठी करणे स्वीकार्य नाही.

बेशरम रंगवर कॉपी केल्याचा आरोप

हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला की, हे गाणे ओरिजनल नसून कॉपी आहे. सोशल मीडियावर काही ट्रोलर्सनी या गाण्याची फ्रेंच गायक जेनच्या मकिबाशी तुलना केली. ट्रोलर्सचे म्हणणे आहे की बेशरम रंगचे बीट मकिबा गाण्यातून चोरले आहेत.

बेशरम रंगविषयी मुस्लिमांचा रोष

पठाणमधील बेशरम रंगविषयी मुस्लीम समुदायातील लोकांनीही विरोध दर्शवला. आरटीआय कार्यकर्ते दानिश खान यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात याविषयी तक्रार दाखल केली. त्यांचे म्हणणे होते की लोक ज्याला भगवा रंग म्हणत आहेत, तो चिश्ती रंग आहे आणि मुस्लीम समाजात याला खूप अर्थ आहे. दानिश यांनी गाणे चित्रपटातून काढण्याचीही मागणी केली होती.

अनेक राज्यांत बेशरम रंग गाणे हटवण्याची मागणी

पठाणला अनेक राज्यांत मोठा विरोध झाला. मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि महाराष्ट्रात आंदोलने झाली. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणसह पाच लोकांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आणि अश्लिलता पसरवल्याच्या आरोपात खटला दाखल झाला.

छत्तीसगडमध्ये शिवसैनिकांनी बेशरम रंग गाणे चित्रपटातून हटवण्याची मागणी केली. त्यांचे म्हणणे होते की असे केले नाही तर छत्तीसगडमध्ये चित्रपट रिलीज होऊ देणार नाही. यूपीच्या मथुरेत हिंदू महासभेनेही चित्रपटाला विरोध केला. याशिवाय नरोत्तम मिश्रा, राम कदम आणि साध्वी प्राचींसारख्या भाजपच्या नेत्यांनीही याला विरोध केला.

शाहरूखची 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर वापसी

शाहरूख खान पठाणसह मोठ्या स्क्रिनवर चार वर्षांनंतर वापसी करत आहे. तो 2018 मधील झिरोमध्ये अखेरचा लीड रोलमध्ये दिसला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चार वर्षांत त्याने ब्रह्मास्त्र, लाल सिंह चड्ढा आणि रॉकेट्रीसारख्या चित्रपटांत कॅमियो केला होता. लीड म्हणून तो पठाणद्वारे धमाकेदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. चित्रपटाचे बजेट 250 कोटी आहे. चित्रपटाचे मीडिया राईटस सुमारे 100 कोटींना विकले गेले आहेत.

एक नजर दीपिका पदुकोण आणि शाहरूख खानच्या ट्रॅक रेकॉर्डवर

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील 10 सीन बदलले

चित्रपटाविषयी वाढता वाद पाहता काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटातील 10 सीन बदलले. याशिवाय काही डायलॉगही बदलण्यात आले. हा निर्णय बोर्डाने बेशरम रंग गाण्याविषयी झालेल्या वादानंतर घेतला होता.

पठाणमधील अनेक शब्दही बदलले आहेत

मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटातील रॉ शब्द बदलून हमारे आणि लंगडे लुले ऐवजी टुटेफुटे पीएमच्या जागी राष्ट्रपती वा मंत्री, पीएमओ शब्द 13 ठिकाणांहून काढण्यात आला आहे. यातील अशोक चक्र, वीर पुरस्कार, माजी केजीबीऐवजी माजी एसबीयू आणि मिसेस भारतमाता बदलून हमारी भारतमाता करण्यात आला आहे. याशिवाय स्कॉचऐवजी ड्रिंक, ब्लॅक प्रिझन रशियाऐवजी केवळ ब्लॅक प्रिझन असा टेक्स्ट दिसेल.

या चित्रपटात डिंपल कपाडियांचीही भूमिका आहे. त्यांच्या फीसविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
या चित्रपटात डिंपल कपाडियांचीही भूमिका आहे. त्यांच्या फीसविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटांच्या नजरेत पठाण...

प्रश्न - पठाणचे ओपनिंग डे कलेक्शन किती असू शकते?

उत्तर - चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन सुमारे 45 कोटी असू शकते. हा चित्रपट केजीएफ-2 च्या ओपनिंग डे कलेक्शनचा रेकॉर्ड मोडू शकतो. चित्रपटासाठी जशी बंपर अॅडव्हान्स बूकिंग होत आहे, त्यामुळे काहीही होऊ शकते. अॅडव्हान्स बूकिंगच्या हिशोबाने हा चित्रपट कमाईचे अनेक विक्रम मोडू शकतो.

केजीएफ-2 चे ओपनिंग डे कलेक्शन 53.95 कोटी होते.

प्रश्न - गांधी गोडसेच्या कमाईचा परिणाम पठाणवर होईल का?

उत्तर - आजिबात नाही. कारण हे आहे की पठाण हा शाहरूख खानचा चित्रपट आहे, तर गांधी गोडसे एक युद्धमध्ये सर्व कलाकार नवीन आहेत.

प्रश्न - वादांमुळे पठाणच्या कमाईत घट होऊ शकते का?

उत्तर - वादामुळे चित्रपटावर सकारात्मक परिणाम झाला आहे. चित्रपट दीर्घ काळ वादात राहिला. ज्या लोकांनी हा चित्रपट क्वचितच बघितला असता, वादामुळे ते आधी हा चित्रपट बघतील. बॉयकॉट गँगने या चित्रपटाला किती मदत केली आहे, हे स्वतः त्यांनाही माहिती नाही. ते हाच विचार करतील की आम्ही याच्या वाईटाचा विचार करत होतो, पण आमच्यामुळे चित्रपटाचे चांगले झाले.

तथापि चित्रपट हे बॉयकॉटमुळे नव्हे तर खराब कंटेंटमुळे फ्लॉप होतात. लाल सिंह चड्ढाचे उदाहरण घ्या, हा चित्रपट यामुळे फ्लॉप ठरला, कारण चित्रपटाची कथाच खराब होती. फ्लॉप होण्याचे एक टक्काही क्रेडिट बॉयकॉट गँगला द्यायला नाही पाहिजे.

प्रश्न - पठाण 2023 च्या हिट चित्रपटांच्या यादीतील पहिला हिट असू शकेल?

उत्तर - नक्कीच, अशीच शक्यता सध्या दिसत आहे की हा 2023 चा पहिला हिट चित्रपट ठरू शकतो.

बातम्या आणखी आहेत...