आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओसरली नाही किंग खानची जादू:'पठाण'ने 10 व्या दिवशी कमावले 'इतके' कोटी, भारतात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शिक होऊन आता दहा दिवस झाले आहेत. प्रेक्षकांमध्ये शाहरुख, दीपिका आणि जॉनची असलेली क्रेझ किंचितही कमी झालेली नाही. रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारीदेखील 'पठाण'ने तिकीटबारीवर चांगली कमाई केली आहे. खरं तर आता पठाणच्या कमाईत घसरण पाहायला मिळतेय. पण चित्रपटाच्या कमाईचे दहाव्या दिवसाचे आकडे समाधानकारक आहे. चित्रपटाने दहाव्या दिवशीही दोन आकडी संख्येत कमाई केली आहे.

किती आहे दहाव्या दिवशीचे कलेक्शन?
बॉक्स ऑफिसवर 'पठाण' चित्रपट दररोज नवीन इतिहास रचत आहे. पठाणने रिलीजच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी भारतात तब्बल 13 कोटींची कमाई केली असल्याची माहिती सिनेविश्लेषक रमेश बाला यांनी दिली आहे. तर नवव्या दिवशी म्हणजे गुरुवारी चित्रपटाने संपूर्ण देशातून 15 कोटी 50 लाख रुपये कमावले आहेत. तर आतापर्यंत पठाणने भारतात 377 कोटी रुपये कमावेल आहेत. 'पठाण'ने हिंदीमध्ये पहिल्याच दिवशी 55 कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 68 कोटी रुपये तर तिसऱ्या दिवशी 38 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली होती.

'पठाण'चा आतापर्यंतचा भारतातील बॉक्स ऑफिस कलेक्शन

  • पहिला दिवस (बुधवार) - 55 कोटी
  • दुसरा दिवस (गुरुवार) - 68 कोटी
  • तिसरा दिवस (शुक्रवार) - 38 कोटी
  • चौथा दिवस (शनिवार) - 51.50 कोटी
  • पाचवा दिवस (रविवार) - 58.50 कोटी
  • सहावा दिवस (सोमवार) - 25.50 कोटी
  • सातवा दिवस (मंगळवार) - 22 कोटी
  • आठवा दिवस (बुधवार) - 17.50 कोटी
  • नववा दिवस (गुरुवार) - 15.50 कोटी
  • दहावा दिवस (शुक्रवार) - 13 कोटी

ठरला भारतात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट
सिनेविश्लेषक रमेश बाला यांनी ट्वीट करत पठाण भारतात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट असल्याचे सांगितले आहे. बाहुबली 2, केजीएफ चॅप्टर 2 आणि दंगल या चित्रपटानंतर पठाणने भारतात सर्वाधिक कमाई केली आहे.

जागतिक पातळीवरील 'पठाण'ची कमाई
रमेश बाला यांनी 'पठाण'चे नवव्या दिवसाचे कमाई आकडे जाहीर करत चित्रपटाने नवव्या दिवसापर्यंत जगभरात 700 कोटींची कमाई केल्याची माहिती दिली होती. चित्रपटाची कमाई पाहता शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम यांचा हा चित्रपट लवकरच एक हजार कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल, अशी आशा सिनेविश्लेषक व्यक्त करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...