आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दंगल'चा रेकॉर्ड मोडित काढणार 'पठाण':ठरणार बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट, जगभरात 700 कोटींची कमाई, देशात 364 कोटींचा गल्ला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पठाण' या चित्रपटाची थिएटरमध्ये यशस्वी घौडदौड सुरू आहे. सिनेविश्लेषक रमेश बाला यांनी सांगितल्यानुसार, या चित्रपटाने रिलीजच्या नवव्या दिवशी 15.50 कोटींची कमाई केली आहे. त्यानुसार एकुण नऊ दिवसांत 'पठाण'ने तब्बल 364 कोटींचा गल्ला जमवला आहे.

वर्ल्डवाईड कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने आतापर्यंत 700 कोटींची कमाई केली आहे. 'पठाण'ची नजर आता 'दंगल'च्या रेकॉर्डवर असेल. 'दंगल'च्या हिंदी व्हर्जनने 374.43 कोटी रुपयांची कमाई केली होती. 'दंगल'चा विक्रम मोडण्यासोबतच 'पठाण' हा बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.

'पठाण'ची प्रत्येक दिवसाची कमाई...

'दंगल'चा डोमेस्टिक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडण्यासाठी 'पठाण' सज्ज
'पठाण'ने रिलीजच्या केवळ नऊ दिवसांत हिंदी भाषेत 364 कोटींची कमाई केली आहे. 'पठाण'ने 'टायगर जिंदा है' (339.16 कोटी), 'पीके' (340.8 कोटी), 'संजू' (342.57 कोटी) या चित्रपटांना कमाईत मागे टाकले आहे. सध्या आमिर खानचा 'दंगल' 374.43 कोटींच्या कमाईसह पहिल्या स्थानावर आहे. पण 'पठाण'च्या कमाईचा वेग पाहता हा चित्रपट लवकरच 'दंगल'चा रेकॉर्ड मोडित काढेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

जगभरात सर्वाधिक कलेक्शन असलेल्या चित्रपटांमध्ये 'पठाण'ची एंट्री
मुळात हिंदी भाषेत बनलेल्या चित्रपटांमध्ये 'दंगल'ने वर्ल्डवाइड 2,024 कोटींचे कलेक्शन केले होते. दुसर्‍या क्रमांकावर सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट होता. या चित्रपटाने जगभरात 969.06 कोटींचे एकूण कलेक्शन केले होते. आता या यादीत 700 कोटींच्या कलेक्शनसह 'पठाण'ची एंट्री झाली आहे.

'पठाण' हा कमी काळात 300 कोटी कमावणारा चित्रपट
'पठाण'ने कमीत कमी वेळेत 300 कोटींचा आकडा पूर्ण केला होता. 'पठाण'ने पहिल्याच आठवड्यात 318.50 कोटींची कमाई करून विक्रम केला आहे. यापूर्वी, 'KGF 2' च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई केली होती. 'KGF 2' ने पहिल्या आठवड्यात 268.63 कोटींची कमाई केली होती तर 'बाहुबली 2' ने 247 कोटी कमावले होते.

'पठाण'ने पहिल्याच दिवशी केला हा विक्रम
'पठाण'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 55 कोटींची बंपर ओपनिंग केली होती. यापूर्वी हा विक्रम 'KGF 2' च्या नावावर होता, ज्याच्या हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी 53.95 कोटी कमावले होते. 'अॅव्हेंजर्स एंडगेम' या हॉलिवूड चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 53.35 कोटींची कमाई केली आहे. 'पठाण'ने हे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

वर्ल्डवाइट कलेक्शनमध्ये 'बाहुबली 2' अजूनही पहिल्या क्रमांकावर
सर्व भाषांमध्ये बनवलेल्या चित्रपटांच्या पहिल्या आठवड्याच्या वर्ल्डवाइड कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट 'बाहुबली 2', 'KGF 2' आणि 'RRR' सारख्या दक्षिणेकडील चित्रपटांपेक्षा मागे पडला आहे. 'बाहुबली 2'ने पहिल्या आठवड्यात जगभरात 712.9 कोटी रुपयांची कमाई केली होती.

'KGF 2' आणि 'RRR' च्या आकड्यांमध्येही फारसा फरक नाही. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 700 कोटींची कमाई करुन 'पठाण' या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

  • पुन्हा एकदा एकत्र दिसणार 'पठाण' आणि 'टायगर':आम्ही सलमान-शाहरुखला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करू, लेखक श्रीधर राघवन यांचे संकेत

शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 350 कोटींच्या जवळ पोहोचले आहे. आता अलीकडेच चित्रपटाचे लेखक श्रीधर राघवन यांनी येणाऱ्या काळात सलमान आणि शाहरुख पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत. पठाण आणि टायगरला भविष्यात एकत्र आणता येईल, असे ते म्हणाले आहेत. हा प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव असेल, असेही त्यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर वृत्त...

  • 'पठाण ही तर फक्त सुरुवात, खरा रेकॉर्ड आता होणार':'जवान'च्या सेटवरून शाहरुखचा फोटो व्हायरल, चेहऱ्यावर पट्टी गुंडाळून दिसला

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. आता 'पठाण'नंतर शाहरुख आगामी 'जवान' या चित्रपटात झळकणार आहे. सध्या 'पठाण'च्या यशाचा आनंद साजरा करणारा शाहरुख आता कामावर परतला आहे. त्याने 'जवान'च्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्याचा सेटवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत शाहरुख खान लांब केसांमध्ये चेहऱ्याला एक पट्टी गुंडाळून उभा असलेला दिसत आहे. एटली दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...

बातम्या आणखी आहेत...