आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा 'पठाण' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. दररोज हा चित्रपट नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे. चित्रपट रिलीज होऊन आता 12 दिवस उलटले आहेत. पण या दिवसांत चित्रपटाची क्रेझ किंचीतही ओसरली नाही. नवव्या आणि दहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडी घसरण पाहायला मिळाली. पण अकराव्या आणि बाराव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली.
शाहरुखच्या पठाणने दुसऱ्या रविवारी म्हणजेच बाराव्या दिवशी चित्रपटाने तब्बल 28 कोटींची कमाई भारतात केली आहे. एवढी कमाई करत चित्रपटाने इतिहास रचला आहे.
'पठाण'चे आतापर्यंतचे भारतीय बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन
जगभरात ओलांडला 800 कोटींचा पल्ला
'पठाण'ची केवळ भारतातच नव्हे तर जगभरात जादू कायम आहे. परदेशातही पठाणचा डंका वाजतोय. सिनेविश्लेषक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाणचे ग्रॉस कलेक्शन 850 कोटींच्या घरात पोहोचले आहे. अवघ्या 12 दिवसांत 850 कोटींचा आकडा गाठून मोठे यश पठाणच्या पदरी पडले आहे.
'पठाण'ने 'दंगल'ला सोडले मागे
शाहरुख खानचा पठाण बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा मान पहिले आमिर खानच्या दंगलच्या नावी होता. दंगलने भारतीय बॉक्स ऑफिसवर 378 कोटींचे कलेक्शन केले होते. पण आता पठाणने दंगलचा हा विक्रम मोडित काढला आहे. पठाणने भारतीय बॉक् ऑफिसवर 430 कोटींचे कलेक्शन केले असून दंगलला मागे टाकले आहे. अजूनही पठाणची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरूच आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत पठाण बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटांमधील कमाईच्या बाबतीत आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालानुसार, पठाणने केवळ 11 दिवसांत 386.50 कोटी कमावले आहेत. या दिवसांमध्ये दंगलने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर केवळ 374.43 कोटींची कमाई केली होती. येथे वाचा सविस्तर वृत्त...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.