आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

77 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला 'पठाण':'KGF 2' आणि 'वॉर'चा रेकॉर्ड मोडणार, पहिल्या दिवशी होऊ शकते एवढी कमाई

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल 4 वर्षांच्या विश्रांतीनंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख मोठ्या पडद्यावर आज दमदार कमबॅक करतोय. त्याची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंगही दमदार झाली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण'मध्ये शाहरुखचा न पाहिलेला अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

चित्रपट 77 हजार स्क्रीन्सवर झाला रिलीज

सिनेविश्लेषक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्वीटनुसार, शाहरुखचा चित्रपट देशभरात 5 हजार 200 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे, जो हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये आहे. तर परदेशात 2 हजार 500 स्क्रीनवर पठाण दाखवण्यात येणार आहे. एकूणच जगभरात हा चित्रपट 77 हजार स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे.

खरं तर बॉलिवूडसाठी गेली काही वर्षे व्यवसायाच्या दृष्टीने निराशाजनक गेली. अशा परिस्थितीत 2023 मधील पहिला मोठा बॉलिवूड चित्रपट 'पठाण'कडून इंडस्ट्रीलाही मोठ्या आशा आहेत. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहता 'पठाण' बॉक्स ऑफिसवर कोटीची उड्डाणे घेणार हे स्पष्ट झाले आहे. शाहरुखचा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो ते पाहूया.

जोरदार अ‍ॅडव्हान्स बुकिंग
गेल्या आठवड्यात 'पठाण'च्या अ‍ॅडव्हान बुकिंगला सुरुवात झाली होती. अनेक सिंगल स्क्रीन थिएटरचे पहिल्या दिवसाचे शोज हाऊसफूल्ल झाले आहेत. रिलीज डेट जवळ येताच सोमवारी आणि मंगळवारी चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा ओघ वाढला. त्यावरुन लॉकडाऊनपूर्वीच्या मोठ्या चित्रपटांना हा चित्रपट आव्हान देतोय.

बॉलिवूडमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक अ‍ॅडव्हान्सचा बुकिंगचा रेकॉर्ड हृतिक रोशनच्या 'वॉर' चित्रपटाच्या नावी आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान बुकिंगमधून तब्बल 26.90 कोटींची कमाई झाली होती. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 'पठाण'ने आतापर्यंत अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 25.75 कोटींची कमाई केली आहे. मंगळवारच्या अखेरीस 'पठाण'चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग 'वॉर'च्या कितीतरी पुढे असण्याची अपेक्षा आहे.

बॉलिवूडचा टॉप ओपनिंग रेकॉर्ड
बॉलिवूडचे टॉप ओपनिंग कलेक्शन 'वॉर'च्या नावी आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी तब्बल 53.35 कोटींचा गल्ला जमवला होता. आता 'पठाण'चे अ‍ॅडव्हान बुकिंगचे आकडे पाहता शाहरुखचा चित्रपट हृतिकच्या चित्रपटाला मात देऊ शकतो. 'पठाण'चे ओपनिंग कलेक्शन 47 ते 50 कोटींपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे.

आतापर्यंतचे बॉलिवूडचे टॉप ओपनिंग असलेले चित्रपट पुढीप्रमाणे

  1. वॉर - 53.35 कोटी रुपये
  2. ठग्स ऑफ हिंदोस्तान - 52.25 कोटी रुपये
  3. हॅपी न्यू इयर - 44.97 कोटी रुपये
  4. भारत - 42.30 कोटी रुपये
  5. प्रेम रतन धन पायो - 40.35 कोटी रुपये

हिंदी चित्रपटांचे टॉप ओपनिंग
गेल्या काही काळात दक्षिणेत बनलेल्या चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनने हिंदीत चांगले कलेक्शन केले आहे. सध्या KGF Chapter 2 चे कलेक्शन सर्व बॉलिवूड चित्रपटांच्या वर आहे. यशच्या चित्रपटाने 'वॉर'चा रेकॉर्ड मोडला आणि पहिल्याच दिवशी 53.95 कोटी रुपयांची कमाई केली होती. जर 'पठाण'चे रिव्ह्यू चांगले आले आणि लोकांकडून त्याला भरभरून वाहवा मिळाली, तर 'पठाण' हा विक्रम मोडीत काढू शकतो.

सिनेविश्लेषक तरण आदर्श सांगतात की, 'पठाण' जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणारा 'पठाण' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट आहे. हाच एक विक्रम आहे.

शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे ओपनिंग कलेक्शन 'हॅप्पी न्यू इयर' या चित्रपटातून आले होते. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 44.97 कोटी रुपये कमावले होते. 'पठाण'चे अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहता हा शाहरुखच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरू शकतो, असे मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...