आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख-सलमानच्या चाहत्यांसाठी दुहेरी आनंद:'पठाण'सोबत रिलीज होणार 'किसी का भाई किसी की जान'चा टिझर; ईदला येणार चित्रपट

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या आगामी चित्रपटाचा टिझर येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. सलमानने या चित्रपटाच्या पोस्टरसोबत एक कॅप्शन शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 25 जानेवारीला 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा टिझर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

'पठाण'सोबत चित्रपटाचा टिझर रिलीज होणार
'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सलमान खानने लिहिले आहे की, 'किसी का भाई किसी की जान चित्रपटाचा टिझर बघा आता मोठ्या पडद्यावर 25 जानेवारी रोजी.' यावरून शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाबरोबर सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा टिझर 25 जानेवारी रोजी देशातील सर्व सिनेमागृहांमध्ये शाहरुख खानच्या 'पठाण'सोबत प्रदर्शित केला जाणार आहे. त्यानंतर याचा टिझर युट्यूब आणि इतर डिजीटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी टिझर लाँच करण्यासाठी 'थिएटर्स फर्स्ट' ही अनोखी शक्कल शोधून काढली आहे.

सलमानने पुन्हा एकदा ईदसाठी स्लॉट बुक केला
सलमान खान ईदच्या मुहूर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओळखला जातो. ईदच्या मुहूर्तावर त्याचे आतापर्यंत 10 चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यापैकी दोन चित्रपट वगळता सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

सलमानचे एक था टायगर, किक, बजरंगी भाईजान आणि सुलतानसारखे चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले. सलमान खानचा शेवटचा ईदला रिलीज झालेला 'भारत' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. आता सलमान खान पुन्हा एकदा ईद 2023 ला धमाल करायला सज्ज झाला आहे.

या चित्रपटात अ‍ॅक्शनचा दमदार डोस पाहायला मिळणार आहे
'किसी का भाई किसी की जान' हा फरहाद सामजी दिग्दर्शित अॅक्शन पॅक्ड चित्रपट आहे. सलमान खानशिवाय या चित्रपटात पूजा हेगडे आणि साऊथ स्टार व्यंकटेश दग्गुबाती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंह, अभिमन्यू सिंह, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर या कलाकारांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानच्या स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसने केली आहे.

सलमान खानच्या या चित्रपटात अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स आणि इमोशनचा जबरदस्त डोस पाहायला मिळणार आहे.

'टायगर 3' 2023 च्या दिवाळीला रिलीज होणार आहे
यशराज फिल्म्सचा स्पाय युनिव्हर्सचा आगामी चित्रपट 'टायगर 3' 10 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' नंतर सलमान 'टायगर 3'मधून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

विशेष म्हणजे यशराज फिल्म्सने 'पठाण'सोबत आपले स्पाय युनिव्हर्स लाँच केले आहे. या स्पाय युनिव्हर्समधील पहिला चित्रपट सलमान खानचा 2012 मध्ये रिलीज झालेला 'एक था टायगर' होता.

'टायगर' सिरीज व्यतिरिक्त हृतिक रोशनचा 'वॉर' हा चित्रपट स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. तर शाहरुख खानचा पठाण हा लेटेस्ट चित्रपट असेल. कतरिना कैफ पुन्हा एकदा सलमानसोबत 'टायगर 3'मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...