आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या 'टायगर 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी 10 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. खरं तर 'टायगर 3'मध्ये शाहरुख खानचाही कॅमिओ असणार आहे, कारण 'पठाण'मधला सलमान खानचा कॅमिओ खूप गाजला होता. पण आता सलमान खानच्या 'टायगर 3'मध्ये 'पठाण'च्या त्याच सीनची पुनरावृत्ती होणार असून त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टीही पाहायला मिळणार असल्याचे ऐकिवात आहे. 'टायगर 3'शी संबंधित सूत्रानेच ही माहिती दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, सलमान खान आणि शाहरुख खान 'टायगर 3'च्या सिक्वेन्ससाठी 7 दिवस एकत्र शूट करणार आहेत. चित्रपटाशी संबंधित एका खास सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'टायगर 3'मध्ये 'पठाण'च्या सीनची पुनरावृत्ती होणार होती. मात्र 'पठाण'ला मिळालेल्या कौतुकानंतर निर्मात्यांनी या सीनमध्ये थोडा करून 'टायगर 3'मध्ये तो सीन जास्त लांबीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर 'टायगर 3' साठी सलमान आणि शाहरुखच्या संवाद आधीच लिहिले गेले होते, परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे.
'टायगर 3'मध्ये शाहरुख खान आणि सलमानचे दमदार सीन्स
'टायगर 3' बद्दल मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या स्क्रीन टायमिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे, त्यासोबतच आणखी अनेक दमदार सीन्सदेखील जोडण्यात आले आहेत. 'टायगर 3'चे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे, पण निर्मात्यांनी सलमान खान आणि शाहरुख खानचे सीन शूट करण्यासाठी 'पठाण' रिलीज होण्याची वाट पाहिली. निर्मात्यांना 'पठाण' चित्रपटात प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहायच्या होत्या. आता पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सलमान आणि शाहरुखची केमिस्ट्री प्रेक्षकांना भन्नाट आवडली. चित्रपटाने जगभरात 1000 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. आता पुन्हा एकदा हाच हिट फॉर्मुला 'टायगर 3'च्या निमित्ताने निर्माते मोठ्या पडद्यावर आणण्याच्या तयारीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.