आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने 'बाहुबली 2' या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. दरम्यान 'बाहुबली 2' चे सहनिर्माते शोबू यारलागड्डा यांनी ट्वीट करून शाहरुख खान आणि 'पठाण'च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले की, 'रेकॉर्ड हे बनतात ते तुटण्यासाठी, परंतु शाहरुख खानच्या चित्रपटाने हा विक्रम मोडला याचा मला आनंद आहे.'
पठाणच्या निर्मात्यांनीही शोबू यांचे आभार मानले आहेत. 'पठाण'ने 4 मार्चलाच 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडला. 'पठाण'ने हिंदीत आतापर्यंत 513.75 कोटींची कमाई केली आहे.
यशराज फिल्म्सने व्यक्त केली कृतज्ञता
शोबू यांचे आभार व्यक्त करताना यशराज फिल्म्सने लिहिले की, 'भारतीय सिनेमा ज्याप्रकारे प्रगती करत आहे हे पाहताना खरोखरच आनंद होतोय. एसएस राजामौली दिग्दर्शित बाहुबली 2 सारखा ऐतिहासिक चित्रपट बनवल्याबद्दल धन्यवाद. या चित्रपटाने आम्हाला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा दिली.'
अवघ्या 38 दिवसांत 'पठाण'ने मोडला 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड
'बाहुबली 2' हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला होता. त्याच्या हिंदी व्हर्जनने 510.90 कोटींची कमाई केली होती. तेव्हापासून हा रेकॉर्ड आजतागायत मोडलेला नाही. आता शाहरुखने चार वर्षांनंतर 'पठाण'च्या माध्यमातून पुनरागमन करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 'पठाण' रिलीजच्या 39 दिवसांनंतर आणि नवीन चित्रपट प्रदर्शित होत असताना चांगला व्यवसाय करत आहे.
आता जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत केवळ 'दंगल'च्या मागे
देशांतर्गत बॉक्स ऑफिससोबतच हा चित्रपट परदेशातही धुमाकूळ घालत आहे. 1028 कोटींच्या कलेक्शनसह 'पठाण' हा 1000 कोटींचा जादुई आकडा गाठणारा दुसरा बॉलिवूड चित्रपट आहे. यापूर्वी हे यश केवळ आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटाच्या नावी होते.
शाहरुखच्या 'पठाण'ने सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'च्या जगभरातील कलेक्शनलाही मागे टाकले आहे. 'बजरंगी भाईजान'ने जगभरात 969.06 कोटींचा व्यवसाय केला. मात्र, दंगल आणि बजरंगी भाईजान चीनमध्ये प्रदर्शित झाले हे लक्षात घेण्यासारखे आहे. या दोन्ही चित्रपटांनी तिथे दमदार कमाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.