आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा एकत्र दिसणार 'पठाण' आणि 'टायगर':सलमान-शाहरुखला एकत्र आणण्याचे लेखक श्रीधर राघवन यांचे संकेत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 350 कोटींच्या जवळ पोहोचले आहे. आता अलीकडेच चित्रपटाचे लेखक श्रीधर राघवन यांनी येणाऱ्या काळात सलमान आणि शाहरुख पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत. पठाण आणि टायगरला भविष्यात एकत्र आणता येईल, असे ते म्हणाले आहेत. हा प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव असेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

पठाण आणि टायगर पुन्हा एकत्र येणार आहेत
'पठाण'मधील सलमान खानचा कॅमिओ चांगलाच गाजला. दोन्ही सुपरस्टार्सना एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच होती. आता यशराज स्पाय युनिव्हर्सच्या पुढच्या चित्रपटात 'पठाण' आणि 'टायगर' एकत्र येण्याची शक्यता आहे.

स्पाय युनिव्हर्सच्या पुढच्या चित्रपटात सलमान आणि शाहरुख या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्रीधर राघवन यांनी पिंकविलाशी बोलताना सांगितले आहे.

सलमान, शाहरुख आणि हृतिक हे स्पाय युनिव्हर्सचा भाग आहेत
'पठाण'च्या ट्रेलरसह यशराज फिल्म्सने त्यांच्या स्पाय युनिव्हर्सची घोषणा केली होता. याअंतर्गत यशराज फिल्म्स बॅनरखाली आजपर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व हेरगिरीवर आधारित चित्रपटांचा समावेश असेल. सलमान खानचा 2012 मध्ये आलेला 'एक था टायगर' हा स्पाय युनिव्हर्सचा पहिला चित्रपट होता. तर आता हृतिक रोशनची 'वॉर' आणि 'पठाण' देखील याच युनिव्हर्सचा एक भाग बनले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, आगामी काळात या तिन्ही सुपरस्टार्सना एका चित्रपटात एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सलमान आणि शाहरुख 'पठाण'मध्ये दिसले होते, आता या फ्रँचायझीचा पुढचा चित्रपट 'टायगर 3'मध्ये देखील प्रेक्षकांना काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे.

'पठाण'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरूच
'पठाण'ची चित्रपटगृहांमध्ये यशस्वी घौडदौड सुरू आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 318.50 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी या चित्रपटाने 22 कोटींची कमाई केली आहे. तर बुधवारी चित्रपटाच्या कमाईचा आकडा 18 कोटी इतका आहे. 'पठाण' हा पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

'पठाण'ने 'KGF 2' आणि 'बाहुबली 2'च्या हिंदी व्हर्जनचे रेकॉर्ड तोडले आहेत. तामिळ आणि तेलुगूचे आकडे एकत्र केले तर चित्रपटाची एकूण कमाई 330.25 कोटी झाली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या आठ दिवसांत जगभरात आतापर्यंत 675 कोटींचे कलेक्शन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...