आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे सध्या ट्रेंडमध्ये आहे. चाहते हे गाणे खूप एन्जॉय करत आहेत. मात्र, आता हे गाणे मूळ नसून कॉपी असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. सोशल मीडियावर काही ट्रोलर्स या गाण्याची तुलना फ्रेंच गायक झैनच्या 'मकिबा' गाण्याशी करत आहेत. 'मकिबा' या गाण्यातून 'बेशरम रंग'चे बॅकग्राउंट बीट चोरण्यात आल्याचे ट्रोलर्सचे म्हणणे आहे.
कॉपी आहे 'बेशरम रंग'चे बॅकग्राउंड बीट
सोशल मीडिया ट्रोलर्स तुलना करण्यासाठी झैनचे 'मकिबा' आणि शाहरुखचे 'बेशरम रंग' ही दोन्ही गाणी पोस्ट करत आहेत. एका ट्रोलरने म्हटले की, 'पठाणचे बेशरम रंग हे गाणे झैनचे मकिबा गाणे चोरून बनवले गेले आहे.'
तर एकाने लिहिले- 'टॅलेंटेड गायक झैनच्या मकिबा गाण्यातून बेशरम रंग या गाण्याचे बीट चोरले असल्याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.'
आणखी एका ट्रोलरने लिहिले- 'हे गाणे ऐकल्यावर हे गाणे आधी कुठे ऐकले आहे, याचा मी विचार केला. काही वेळाने मला आठवले की हे झैनचे मकिबा गाणे आहे.'
'बेशरम रंग'ला दोन दिवसांत 3 कोटी 20 लाख व्ह्यूज मिळाले
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या या गाण्याला दोन दिवसांत 3 कोटी 20 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात दीपिका पदुकोणचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. तिच्या डान्स मूव्हजही बोल्ड आहेत. शाहरुखचा डॅशिंग लूकही यात लक्ष वेधून घेतोय. या गाण्याला शिल्पा रावने आवाज दिला आहे तर विशाल-शेखरने ते संगीतबद्ध केले आहे. हे गाणे वैभवी मर्चंटने कोरिओग्राफ केले आहे. रिलीज झाल्यापासून हे गाणे विविध कारणांनी चर्चेत आहे.
'पठाण' 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे
'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. सिद्धार्थ आनंदला 'वॉर' आणि 'बँग बँग' सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. पठाणसोबत शाहरुख तब्बल चार वर्षांनंतर मुख्य भूमिकेत रुपेरी पडद्यावर परतत आहे.
त्याचा शेवटचा सोलो चित्रपट 'झिरो' होता. दरम्यान, तो अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ करताना दिसला. सूत्रांच्या माहितीनुसार शाहरुखने 'पठाण'साठी 100 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
शाहरुख देवाच्या चरणी
शाहरुख खान सध्या आपल्या 'पठाण' चित्रपटाच्या यशासाठी साकडे घालण्यासाठी देवाच्या चरणी जातोय. त्याने नुकतेच माँ वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. याशिवाय डंकी चित्रपटाचे शूटिंग संपवून त्याने मक्का येथे जाऊन उमराही केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.