आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पठाण'चे शीर्षक बदलणार - केआरकेचा दावा:म्हणाला - चित्रपटात भगवी बिकिनी दिसणार नाही; निर्मात्यांनी मात्र फेटाळले वृत्त

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादाच्या भोवऱ्यात सापडलेला शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 25 जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान उर्फ केआरके याने या चित्रपटाबाबत एक मोठा दावा केला आहे. स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या केआरकेने एका ट्वीटमध्ये दावा केला की, शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटाचे नाव आता बदलण्यात येणार आहे. इतकेच नाही तर 'पठाण'ची रिलीज डेट बदलण्याचाही निर्माते विचार करत असल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी अशा कोणत्याही बदलाचे वृत्त फेटाळून लावले आहे.

'पठाण'चे शीर्षक बदलले जाईल हे निश्चित झाले आहे - KRK
ट्विटर हँडलवर केआरकेने 'पठाण' या चित्रपटाबाबत एक ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये केआरकेने लिहिले- 'पठाणचे शीर्षक आता बदलत असल्याची पुष्टी झाली आहे. गाण्यात भगवी बिकिनीही नसेल. निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाची नवी रिलीज डेट आज किंवा उद्या येणार आहे," असे त्याने म्हटले आहे. केआरकेचे हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

'पठाण' हे शीर्षक चुकीचे आहे असे मी आधीच सांगितले होते – KRK
2 जानेवारी रोजी केलेल्या एका ट्वीटमध्ये केआरकेने लिहिले होते, "पठाणचा ट्रेलर आज रिलीज झाला नाही. मी काही दिवसांपूर्वी जे काही बोललो ते खरे असल्याचा हा पुरावा आहे. शाहरुखने चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मी चित्रपटाच्या घोषणेच्या दिवशीच शीर्षक चुकीचे असल्याचे सांगितले होते, पण शाहरुखने तेव्हा माझे ऐकले नाही. अखेर त्याला आता माझे म्हणणे ऐकावे लागले आहे." केआरके बऱ्याच दिवसांपासून 'पठाण' चित्रपटाचे रिलीज डेट आणि नाव बदलले जाईल असा दावा करत आहे.

युजर्सनी पोस्टवर दिल्या प्रतिक्रिया
केआरकेच्या या ट्वीटवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले- 'रिलीज डेट पुढे ढकलली नाही तर रिव्ह्यू देणे थांबवा.’ आणखी एका नेटक-याने लिहिले- ‘असे काही होणार नाही.’ तर एक नेटकरी म्हणाला - 'पठाणचे नाव तेच राहील, बदलणार नाही'. दुसरीकडे अनेक लोक केआरकेच्या या पोस्टवर त्याचे समर्थन करत आहे, तर काही लोक त्याला ट्रोल करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...