आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 जानेवारीला येणार 'पठाण'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर:निर्मात्यांनी बनवली खास स्ट्रॅटेजी, चित्रपटाच्या शीर्षकात कोणताही बदल होणार नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा ट्रेलरची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. येत्या 10 जानेवारीला चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 'पठाण'चा ट्रेलर 2 मिनिटे 37 सेकंदांचा असणार आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शन सीक्वेन्स, म्युझिक आणि हिरोइझमचा परिपूर्ण मसाला असेल असे सांगण्यात येत आहे. ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात टक्कर पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय.

हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या दोन आठवड्याआधी ट्रेलर लाँच करणे ही निर्मात्यांची एक रणनीती असल्याचे मानले जात आहे. पठाणच्या गाण्यावरून सध्या वाद सुरू आहे. बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीवरुन वादंग उठले आहे. यारुन देशभरात विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत. आता या चित्रपटाच्या शीर्षकात कोणताही बदल होणार नसल्याचे वृत्त आहे.

सोशल मीडियावर ट्रेंड होतोय 'पठाण'
शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट 2023 च्या मोस्ट अवेटेड चित्रपटांमध्ये आघाडीवर आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख स्वत: देखील त्याच्या चित्रपटाची खूप वाट पाहत आहे, कारण तो चार वर्षांनी मुख्य भूमिकेत रुपेरी पडद्यावर परतत आहे.

या चित्रपटाचा टिझर खूप आधी रिलीज झाला आहे, पण आता ट्रेलर 10 जानेवारीला लाँच होणार आहे. ही माहिती मीडियाला मिळताच पठाण सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. या चित्रपटाची चर्चा पाहता त्याचा ट्रेलर उशिरा लाँच करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सांगितल्यानुसार, चित्रपटाच्या टायटलमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.

'पठाण' हा स्पाय युनिव्हर्सचा भाग
यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स अंतर्गत 'पठाण' हा चौथा चित्रपट आहे. याआधी 'टायगर जिंदा है', 'एक था टायगर' आणि 'वॉर' हे स्पाय युनिव्हर्सचा भाग बनले आहेत. 'पठाण'नंतर या स्पाय युनिव्हर्सचा पुढचा चित्रपट हृतिक रोशन स्टारर 'फाइटर' असेल.

चार वर्षांनी 'पठाण'द्वारे पुनरागमन करत आहे शाहरुख
शाहरुख खान चार वर्षांनी 'पठाण' या चित्रपटाद्वारे मुख्य भूमिकेत कमबॅक करत आहेत. तो शेवटचा 2018 मध्ये आलेल्या झिरो चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चार वर्षांत तो 'ब्रह्मास्त्र', 'लाल सिंग चढ्ढा' आणि 'रॉकेट्री' सारख्या चित्रपटांमध्ये कॅमिओ रोलमध्ये झळकला.

आता शाहरुख 'पठाण'सोबत धमाकेदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाशिवाय जॉन अब्राहम देखील दिसणार आहे.

रिलीजपूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे
'पठाण' रिलीजपूर्वी वादात सापडला आहे. 'बेशरम रंग' या चित्रपटातील पहिल्या गाण्याने वाद निर्माण केला. दीपिका पदुकोणने या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. दीपिकाच्या कपड्यांवरुन अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

गाणे बदलली नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आता हा गोंधळ पाहता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना गाण्यात बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

100 कोटींना विकले गेले हक्क पठाण या चित्रपटाचे बजेट सुमारे 250 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तानुसार, चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच चांगली कमाई केली आहे. चित्रपटाचे मीडिया हक्क जवळपास 100 कोटींना विकले गेले आहेत, त्यामुळे या चित्रपटाने आधीच निम्मा निर्मिती खर्च वसूल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...