आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खान स्टारर 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे रिलीज झाल्यानंतर चित्रपट वादात सापडला. या गाण्यात दीपिका बिकिनीत अगदी बिनधास्त आणि बोल्ड अंदाजात दिसली आहे. तिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन गोंधळ निर्माण झाला आहे. तिच्या लूकवर नक्कीच लाखोंचा खर्च झाला आहे, पण दुसरीकडे शाहरुखदेखील मागे नाही. या गाण्यातील शाहरुखच्या लूकसाठीही लाखोंचा खर्च करण्यात आला आहे.
‘आजतक’च्या वृत्तानुसार शाहरुखने या गाण्यासाठी परिधान केलेला शर्ट 8,194.83 रुपयांचा आहे. काळ्या रंगाचा फ्लोलर प्रिंट असलेला शाहरुखचा शर्ट AllSaints ब्रॅण्डचा आहे. हा शर्ट ऑनलाइन उपलब्ध असतो. पण हे गाणे रिलीज झाल्यानंतर शर्ट आउट ऑफ स्टॉक झाले आहे.
आता वळुया किंग खानच्या शूजकडे. या गाण्यासाठी शाहरुखने घातलेल्या शूजची किंमत तर लाखोंच्या घरात आहे. तब्बल 1,10,677.60 रुपये या शूजची किंमत आहे. शाहरुखने या गाण्यामध्ये घातलेला गॉगलही तितकाच महागडा आहे. Eyevan 7285 Model 163(800) Titanium Frame असलेला शाहरुखच्या गॉगलची किंमत 41 हजार 210 रुपये इतकी आहे. शाहरुखच्या या महागड्या लूकनेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बॉलिवूडला अनेक उत्कृष्ट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल 9 वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. 'गांधी गोडसे - एक युद्ध' या चित्रपटातून ते पुनरागमन करत आहे. मात्र, आता हा चित्रपट चर्चेत आहे, कारण त्याची बॉक्स ऑफिसवर थेट शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाशी टक्कर होणार आहे. 'पठाण' 25 जानेवारीला रिलीज होत आहे, तर 'गांधी गोडसे - एक युद्ध' 26 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. राजकुमार संतोषी यांनी त्यांच्या करिअरमध्ये 'द लिजेंड ऑफ भगत सिंग', 'दामिनी' आणि 'घायल'सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. वाचा सविस्तर...
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. दीपिकाने या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने हा वाद निर्माण झाला आहे. अनेक स्तरातून चित्रपटावर टीका होतेय. राजकारण्यांसह अनेक कलाकारांनीही यावर टीका केली आहे. पण अभिनेत्री स्वरा भास्करने मात्र चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ‘बेशरम रंग’ गाण्यातील दृश्य आणि कपडे यात बदल न केल्यास मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यावरुन स्वराने त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. वाचा सविस्तर...
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘पठाण’ या चित्रपटाचा वाद शमण्याची सध्या तरी चिन्ह दिसत नाहीयेत. अनेक स्तरातून या चित्रपटाला विरोध दर्शवला जातोय. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित होताच वादाला तोंड फुटले. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने हा वाद उफाळला आहे. सोशल मीडियावरूनही या चित्रपटाला विरोध दर्शवण्यात येत आहे. अनेक राजकीय मंडळींनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काही ठिकाणी चित्रपटाच्या निषेधार्थ कलाकारांचे पोस्टर जाळण्यात आले. आता या वादामध्ये अभिनेते मुकेश खन्ना यांनी उडी घेतली आहे. त्यांनी गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या ड्रेसवर आक्षेप घेतला आहे. वाचा सविस्तर...
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान स्टारर पठाण हा चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण प्रदर्शनापूर्वीच या चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे रिलीज झाल्यापासून त्यावर कडाडून टीका होतेय. अनेक ठिकाणी शाहरुख आणि दीपिका यांचे पोस्टर जाळण्यात आले आहेत. शिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा आक्रमक पवित्रा अनेक संघटनांनी घेतला आहे. या गाण्यामध्ये दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. गाण्यात शाहरुख खान आणि दीपिका यांच्यात इंटिमेट सीन दाखवण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.