आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील रविवारच्या रात्रीपासून जोगेश्वरी येथील एका गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाइन असलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना शुक्रवारी दुपारी मुक्त करण्यात आले. त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने त्यांना कोणतेही कारण न देता तेथून जाण्यास सांगितले. येथून सुटल्यानंतर ते आता मुंबई विमानतळावरून पाटण्याकडे रवाना झाले. गेस्ट हाऊसमधून बाहेर पडताना माध्यमांशी बोलताना तिवारी म्हणाले, "त्यांनी मला नव्हे, तर या प्रकरणाच्या चौकशीला क्वारंटाइन केले होते. बिहार पोलिस चौकशी करत होते मात्र त्यांच्या कामात अडथळा आणण्याचे काम केले गेले."
तत्पूर्वी, स्वतःला क्वारंटाइन ठेवण्याच्या प्रश्नावर विनय तिवारी यांनी दैनिक भास्करला सांगितले की, "मी स्वत:ला क्वारंटाइन समजत नाहीये. मी ऑन ड्युटी आहे आणि आपले कर्तव्य बजावत आहे. बेकायदेशीरपणे मला क्वारंटाइन ठेऊन बीएमसीने आपली विश्वासार्हता गमावली आहे. माझी कोरोनाची चौकशी करुन ते मला सोडू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. असे वागून महाराष्ट्र सराकारने सुशांत प्रकरणाच्या तपासाबद्दल लोकांच्या मनात शंका उपस्थित केल्या आहेत.'
गुरुवारी एसपी विनय तिवारी म्हणाले होते की, "आमची टीम यापूर्वीच मुंबईत आली होती आणि त्यांनी लोकांची चौकशी करण्यास सुरवात केली होती. आमची टीम बर्याच बाबींवर काम करत होती. त्यांना तपासात मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळत नव्हते. त्यामुळे मला मुंबईत यावे लागले. पण त्यानंतर जे घडले ते सर्वांसमोर आहे. आम्ही बरीच तयारी करुन येथे आलो होतो."
विनय तिवारी म्हणाले, "सुशांत कोणत्या लोकांसोबत राहात होता. तो कोणाबरोबर काम करत होता. कोणाशी त्याने व्यवहार केला. कोणत्या लोकांच्या तो संपर्कात होता. आम्ही अशा लोकांची यादी तयार केली होती. ज्यावर आमच्या टीमने काम सुरू केले होते." बिहार पोलिसांची टीम या सर्वांचे जबाब नोंदवणार होती, असे तिवारी यांनी सांगितले.
तत्पूर्वी पाटण्याच्या आयजींनी बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना 3 ऑगस्ट रोजी लॉकडाऊन नियमात शिथिलता आणण्यासाठी पत्र लिहून एसपी विनय तिवारी यांना सोडण्यास सांगितले होते. मात्र पालिकेने त्यांची ही मागणी फेटाळली होती. त्यानंतर बिहारच्या डीजीपींनी बीएमसीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
दरम्यान, गुरुवारी सीबीआयने सुशांत प्रकरणातीतल 6 आरोपी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, सुशांतच्या घरातील व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा, पर्सनल मॅनेजर श्रुती मोदी आदींचा समावेश आहे. शुक्रवारी ईडीने याच प्रकरणात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ श्रुती आणि त्याच्या सीएची चौकशी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.