आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिस:वीकेण्ड कलेक्शनमध्ये 'मास्टर'ला 'वकील साब'ने पिछाडले, कोरोनाच्या काळात टॉप 10 वीकेण्ड ग्रॉसर्समध्ये एकाही हिंदी चित्रपटाची वर्णी नाही

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत 70 कोटी रुपयांची कमाई केली होती.

पवन कल्याण स्टारर 'वकील साब’ने कमाईच्या बाबतीत पहिल्या आठवड्यात विजय आणि विजय सेतुपती स्टारर 'मास्टर’ला पिछाडले आहे. महामारीच्या काळात पहिल्या आठवड्यात सर्वात जास्त कमाई करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे. गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत 70 कोटी रुपयांची कमाई केली होती. जानेवारीत रिलीज झालेल्या 'मास्टर’ने तीन दिवसांत 69 कोटीची कमाई केली होती. ही कमाई फक्त दक्षिणेतच केली होती.

'वकील साब'ची तीन दिवसांची कमाई

दिवसकमाई
शुक्रवार37.50 कोटी रुपये
शनिवार16 कोटी रुपये
रविवार16.50 कोटी रुपये
एकुण70 कोटी रुपये

टॉप 10 मध्ये एकाही हिंदी चित्रपटाचा समावेश नाही
महामारीच्या काळात पहिल्या आठवड्याच्या कमाईत टॉप 10 चित्रपटांच्या यादीत हिंदीच्या एकाही चित्रपटाचे नाव नाही. कारण कोरोना काळात एकही मोठा चित्रपट रिलीज झाला नाही. जे चित्रपट रिलीज झाले, त्यांना फक्त 50 टक्केच प्रेक्षक मिळू शकले, कारण सीमित थिएटर उघडले होते. फक्त जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांचा ‘रूही’नेच फक्त वीकेंड कलेक्शनमध्ये 10 कोटींचा आकडा पार केला होता. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात सुमारे 12.50 कोटींची कमाई केेली होती.

हे आहेत टॉप 10 वीकेण्ड ग्रॉसर्स भारतीय चित्रपट

क्र.चित्रपटवीकेण्ड कलेक्शन
1वकील साब (तेलुगु)70 कोटी रुपये
2मास्टर (तामिळ)69 कोटी रुपये
3
रॉबर्ट (कन्नड)31 कोटी रुपये
4उप्पेना (तेलुगु)30.50 कोटी रुपये
5
पुगारा (कन्नड)23 कोटी रुपये
6कर्णन (तामिळ)20 कोटी रुपये
7
क्रैक (तेलुगु)18.50 कोटी रुपये
8युवारथाना (कन्नड)18.50 कोटी रुपये
9
रेड (तेलुगु)18 कोटी रुपये
10सुलतान (तामिळ)17.50 कोटी रुपये
बातम्या आणखी आहेत...