आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणात प्रवेश:पायल घोषचा रामदास आठवलेंच्या पक्षात प्रवेश, हाती घेतला ‘आरपीआय’चा झेंडा;  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A च्या वुमन विंगची झाली उपाध्यक्ष

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A च्या वुमन विंगच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पायलवर सोपवण्यात आली आहे.

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोष हिने आता राजकारणात प्रवेश केला आहे. आरपीआयचे सर्वेसर्वा डॉ.रामदास आठवलेंच्या पक्षात तिने प्रवेश करत आरपीआयचा झेंडा हाती घेतला आहे. रामदास आठवलेंनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायलचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. पायल घोषसह अभिनेत्री कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकूर चाफेकर यांनी आरपीआयमध्ये पक्षप्रवेश केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A च्या वुमन विंगच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पायलवर सोपवण्यात आली आहे.

  • पायल घोषवर अन्याय झाला - रामदास आठवले

दिग्दर्शक अनुराग कश्यपने लैंगिक शोषण केल्याचा दावा करणाऱ्या पायलने आपल्यला न्याय मिळावा असे म्हणत अनेक खटाटोप केले होते. पोलिस तक्रार दाखल केल्यानंतरही अनुरागची चौकशी न झाल्याने तिने थेट राज्यपालांकडे धाव घेतली होती. यात सगळ्यात तिला रामदास आठवलेंनी पाठिंबा दर्शवला होता. आज झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी पायलचा पक्षप्रवेश जाहीर केला. ते म्हणाले, ‘पायल घोषवर अन्याय झाला होता. तिने अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पायलवर अन्याय झाल्याने आपण तिची बाजू घेतली, आंदोलन केले, राज्यपालांना भेटलो. यानंतर याप्रकरणात पुढच्या हालचाली सुरू झाल्या.

मात्र, पोलिसांनी अद्याप अनुरागला अटक केली नाही. त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. यासगळ्यात आम्ही पायलसोबत आहोत. पायलसाठी आम्हाला थेट पश्चिम बंगालहून फोन आले. म्हणूनच आम्ही पायलला पाठिंबा देत आहोत. अनुरागला अटक व्हावी ही आमची मागणी असून, आता पायल आरपीआय पक्षात प्रवेश करते आहे, असे रामदास आठवले या पत्रकार परिषदेत म्हणाले.