आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईत राहणार्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप केला आहे. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कश्यपला 1 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. बुधवारी मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यातून अनुरागला समन्स बजावण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, समन्समध्ये त्याला पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबई सोडू नका, असे सांगण्यात आले आहे.
अनुराग कश्यपने आपल्या वकिलांच्या माध्यमातून बलात्काराचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावणारे निवेदन जारी केले आहे. यात त्याने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
पीडित अभिनेत्रीने मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. अनुराग कश्यपकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे तिने म्हटले आहे. राजभवनातून बाहेर पडल्यावर पीडिता म्हणाली होती की, "बलात्काराचा आरोपी रस्त्यावर मुक्तपणे फिरत आहे, म्हणून मला सुरक्षा देण्यात यावी". पीडितेसह आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले आणि त्यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते राजभवनात उपस्थित होते. अनुराग कश्यपला लवकरात लवकर अटक न केल्यास उपोषणावर बसणार असल्याचे पीडितेने म्हटले आहे.
22 सप्टेंबर रोजी पीडित अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम 376, 354, 341 आणि 342 अंतर्गत कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे,
दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीला रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच तिला ‘वाय श्रेणी’तील सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर स्वराने संताप व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. मंगळवारी उपचारांदरम्यान पीडित तरुणीचा मृत्यू झाला. “या पीडितेच्या मदतीसाठी रामदास आठवले पुढे का आले नाहीत? पायल पेक्षा या पीडितेच्या कुटुंबीयांना त्यांच्या मदतीची गरज अधिक होती.” अशा आशयाचे ट्विट करुन स्वराने रामदास आठवले यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अच्छा होता अगर मंत्री आठवले जी यह support हाथरस सामूहिक बलात्कार की पीड़िता जिनका आज निधन हुआ- उसे और उसके परिवार को भी देते। 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 https://t.co/iUWv93xP8k
— Swara Bhasker (@ReallySwara) September 29, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.