आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावणाऱ्या अभिनेत्री पायल घोषने ऋचा चड्ढाची बिनशर्त माफी मागितली आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात ऋचा चड्ढा आणि पायल घोष यांनी आपापसांतील वाद सामंजस्याने मिटवल्याची कबुली मुंबई उच्च न्यायालयासमोर दिली आहे. याआधी न्यायालयाने त्यांना वाद मिटवण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती.
पायलला माफ करत ऋचाने तिच्यावर दाखल केलेली मानहानीची केस मागे घेतली आहे. सोबतच ट्विटर आणि इतर सोशल मीडियावरील ऋचाविरोधातील सर्व पोस्ट काढून टाकण्याचे वचनही ऋचाने कोर्टात दिले आहे.
Richa Chadda v Payal Ghosh Defamation Suit :
— Live Law (@LiveLawIndia) October 14, 2020
Lawyers of Chadda and Ghosh tell Bombay HC that settlement terms have been finalized.@RichaChadha @iampayalghosh pic.twitter.com/2tkhufyD9n
या प्रकरणाची सुनावणी ए.के. मेनन यांच्या खंडपीठासमोर झाली. पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर या प्रकरणात ऋचा चड्ढा हिचे नावदेखील घेतले होतते. त्यामुळे ऋचाने पायलविरोधात 1.1 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीत पायलचे वकील नितीन सातपुते यांनी पायल ऋचा चड्ढाची माफी मागणार असल्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे पायलने उच्च न्यायालयसमोर ऋचाची माफी मागितली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पायलने एका मुलाखतीदरम्यान ऋचा चड्ढाचे नाव घेतले होते. पायल म्हणाली होती की, ‘अनुराग कश्यप यांनी मला सांगितले की ऋचासह अनेक अभिनेत्री त्याच्यासोबत कम्फर्टेबल झाल्या आहेत’. त्यावरुन ऋचाने पायलला सडेतोड प्रत्युत्तर देत उच्च न्यायालयात पायलविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
काय आहेत अनुरागवर पायल घोषचे आरोप?
अनुरागने माझा लैंगिक छळ केला, तसंच अभद्र भाषेचाही वापर केला, असा आरोप पायल घोषने केला आहे. एका मुलाखतीत पायलने तिची आपबिती कथन केली होती.
तिने सांगितल्यानुसार, "मी अनुराग यांना भेटायला त्यांच्या यारी रोड इथल्या ऑफिसमध्ये गेली होती. ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत होते म्हणून मी परत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि बोलावले. काही ग्लॅमरस घालू नको असे त्यांनी सांगितले. म्हणून मी सलवार कमीज घालून त्यांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी जेवण बनवले, आमचे जेवण झाल्यानंतर त्यांनी माझी जेवणाची प्लेटही उचलली. त्यानंतर मी तिथून निघून आले. त्यांनी मला पुन्हा मेसेज करून बोलावले. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता म्हणून मी त्यांना भेटायला नाही येऊ शकत असे सांगितले." यानंतर दोन-तीन दिवसांनी मी अनुराग यांना पुन्हा भेटले, यावेळी मी त्यांच्या घरी गेले होते, असे पायलने सांगितले.
पायल म्हणाली, "त्यांनी मला घरी बोलावले होते. ते स्मोकिंग करत होते, मी तिथे बसले होते. त्यानंतर अनुराग यांनी मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक ते माझ्यासमोर न्यूड झाले आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्यांना म्हटले मला कन्फर्टेबल वाटत नाहीये, यावर ते मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाले. मी पुन्हा त्यांना सांगितले, मला अस्वस्थ वाटतंय. काही तरी करून मी तिथून कसाबसा पळ काढला. त्यानंतर मी त्यांना कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावले. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो", असे पायल म्हणाली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.